New Delhi : लोकसभेच्या अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील पहिला दिवस वादळी ठरला. सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण सत्ताधाऱ्यांना चांगलेच झोंबले. विशेष म्हणजे मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या सदस्याच्या भाषणादरम्यान दोनदा उठून हस्तक्षेप करावा लागला.
राहुल गांधी यांच्या भाषणातून काही मुद्यांवर मोदींसह सत्ताधारी खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली. पण राहुल यांनी आपले लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाल्यानंतरचे पहिले भाषण सुरूच ठेवत सत्ताधाऱ्यांवर जोरदार आसूड ओढले.
पंतप्रधान मोदी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर बोलण्याची शक्यता आहे. यावेळी ते राहुल गांधी यांनाही प्रत्युत्तर देतील. त्याआधी मंगळवारी सकाळी अधिवेशनाला सुरूवात होण्यापुर्वी मोदींनी एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन केले.
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील सोमवारच्या भाषणावरून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली. राहुल गांधी यांची भाषा ठीक नव्हती. आपण संसदेत असे वागायचे नाही, असा सल्ला मोदींनी खासदारांना दिल्याचे रिजिजू यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आज बोलणार
पंतप्रधान मोदी लोकसभेत मंगळवारी दुपारी चार वाजता अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलणार आहेत. तर बुधवारी ते राज्यसभेत चर्चेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधानांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते राहुल गांधींना कसे प्रत्युत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.