YS Sharmila Sarkarnama
देश

YS Sharmila : शर्मिला यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये बंड? प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याने उठलं वादळ

Congress : शर्मिला यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Rajanand More

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांना पक्षात घेतलं. पण त्यानंतर काही दिवसांतच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या राजीनाम्याबाबत पक्षाकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिदुगु रुद्र राजू (Gidugu Rudra Raju) यांनी सोमवारी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये (Congress) संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच पक्षात दाखल झालेल्या शर्मिला यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शर्मिला (YS Sharmila) यांनी बारा दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी आपला वायएसआर तेलंगणा काँग्रेस पक्षही विलीन केला. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत (Assembly Election) त्यांनी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. त्याचा मोठा फायदा काँग्रेसला झाला. तेव्हापासूनच त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्ये पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शर्मिला यांना पुढे करण्याची जोरदार तयारी केल्याचे समजते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितल्याची चर्चा आहे. शर्मिला यांना प्रदेशाध्यक्ष करून राज्याची धुरा त्यांच्याकडे दिल्यास जगनमोहन (JaganMohan Reddy) यांच्यासमोर आव्हान उभे करता येऊ शकते, असा विश्वास पक्षाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत अद्याप अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच नवीन प्रदेशाध्यक्ष कोण, याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. शर्मिला यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT