Milind Deora in Shiv Sena : देवरांचा मोठा खुलासा; काँग्रेस सोडण्याआधी बड्या नेत्याचा फोन आला अन् पक्कं झालं...

Congress : देवरांनी रविवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे...
Milind Deora
Milind DeoraSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी खासदार मिलिंद देवरांनी रविवारी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. असे असले तरी देवरांना काँग्रेसमधून थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, असा नवा खुलासा समोर आला आहे. उलट दिल्लीतील एका ज्येष्ठ नेत्याच्या फोननंतर काँग्रेस सोडण्याचा निर्णय पक्का झाल्याचे देवरा यांनी म्हटलं आहे.

देवरांनी (Milind Deora) शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यानंतर पुर्वीची काँग्रेस राहिली नसल्याचा आरोप केला होता. विकासाच्या वाटेवर जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखती आणखी एक खुलासा केला आहे. काँग्रेस (Congress) सोडण्याआधी थांबवण्याचा प्रयत्न झाला की नाही, याबाबत देवरांना विचारण्यात आले होते.

Milind Deora
Devendra Fadnavis : मोहीम स्वच्छतेची, चर्चा फक्त फडणवीसांच्या हटके लुकची...

देवरांनी त्यावर उत्तर देताना सांगितले की, मला थांबवण्याचा प्रयत्न झाला नाही. कोणत्याही नेत्याचा त्यासाठी फोन आला नाही. पण पक्षातील एका नेत्याचा फोन आला होता, तो मनधरणी करण्यासाठी नव्हता. मी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदिवशीच पक्ष सोडू नये, असे ते म्हणाले. त्यांच्या या भूमिकेमुळे मला खूपच त्रास झाला आणि पक्ष सोडण्याचा निर्णय अधिक पक्का झाल्याचे देवरांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देवरा यांनी ज्यादिवशी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्याच दिवशी न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरूवात झाली. या टायमिंगवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देवरांची बाहेर पडण्याची वेळ निश्चित केल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. न्याय यात्रेपासून लक्ष विचलित करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आल्याचे या नेत्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करताना देवरा यांनी म्हटले होते की, पक्षाच्या कठीण काळात मागील दहा वर्ष मी सोबत राहिलो. मागील 55 वर्षांचे माझ्या कुटुंबीयांचे काँग्रेसशी असलेले संबंध तोडणे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण आता पुर्वीची काँग्रेस राहिली नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध केला जात आहे. मागील दहा वर्षांत मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. याचे पूर्ण श्रेय मोदींना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सशक्त होत असल्याचे देवरा म्हणाले होते.

Milind Deora
Lok Sabha Election 2024 : महायुतीचे ठरेना! कोल्हापूर, हातकणंगलेचा घोळ दिल्ली दरबारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com