Supreme Court : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत सुप्रीम कोर्टाचा हिंदू याचिकाकर्त्यांना मोठा झटका

Mathura’s Sri Krishna Janmabhoomi : शाही ईदगाह मशिदीच्या सर्व्हेबाबत झाली सुनावणी...
Mathura’s Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
Mathura’s Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid disputeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीतील वादप्रकरणी सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा सर्व्हे करण्याच्या आदेशाला आणि कमिशनर नियुक्तीलाही स्थगिती दिली. कोर्टाच्या या आदेशामुळे हिंदू याचिकाकर्त्यांना मोठा झटका बसला आहे.

अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad HighCourt) 14 डिसेंबरला शाही ईदगाह परिसरात सर्व्हेला मंजुरी दिली होती. त्याविरोधात ईदगाह कमिटीकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी हिंदू याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर प्रश्न उपस्थित करीत अर्ज स्पष्ट नसल्याचे निरीक्षण नोंदवले. तुम्हाला नेमके काय हवे आहे, हे स्पष्ट होत नाही, असेही कोर्टाकडून नमूद करण्यात आले. (Mathura’s Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute)

Mathura’s Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
Milind Deora in Shiv Sena : देवरांचा मोठा खुलासा; काँग्रेस सोडण्याआधी बड्या नेत्याचा फोन आला अन् पक्कं झालं...

सुप्रीम कोर्टाने सर्व्हेसाठी कमिशनर नेमण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देताना ट्रायल कोर्टात वादप्रकरणाची सुनावणी सुरूच राहील, असे म्हटले आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार असून तोपर्यंत सर्व्हेबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शाही ईदगाहमध्ये सर्व्हेच्या मागणीसाठी अलाहाबाद हायकोर्टात याचिका करण्यात आली होती. मशिदीच्या जागी पूर्वी श्रीकृष्णाचे मंदिर होते. हे ठिकाण श्रीकृष्णाची जन्मभूमी आहे. इथे हिंदू मंदिर असल्याचे अनेक संकेत असल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला होता. तिथे एक कमळाच्या आकाराचा स्तंभ असून हिंदू मंदिरातील ही विशेषतः असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते.

R...

Mathura’s Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid dispute
US Presidential Election : डोनाल्ड ट्रम्पसाठी भारतीय 'रामास्वामीं'चा त्याग ; राष्ट्राध्यक्षपदाचा दावा सोडला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com