Andhra Pradesh CM’s Poster Sarkarnama
देश

Andhra Pradesh News : ऐकावं तर नवलचं ; मुख्यमंत्र्यांचं बॅनर फाडणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा ; सहा कोटी जनतेचा अपमान..

Police Complaint Against Dog For Tearing Andhra Pradesh CM’s Poster : कुत्र्याने राज्यातील ६ कोटी जनतेचा अपमान केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Police Complaint Against Dog For Tearing Andhra Pradesh CM’s Poster : राजकीय व्यक्तींचे बॅनर फाडल्याप्रकरणी विरोधकांवर आरोप करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा घटना आपण वाचल्या असतील, पण मुख्यमंत्र्याचं बॅनर फाडले म्हणून चक्क एका कुत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही अनोखी घटना विजयवाडा येथी नुकतीच घडली. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे छायाचित्र असलेले भिंतीवरील बॅनर एका कुत्र्याने फाडल्याने त्याच्याविरोधात विजयवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जगन मोहन रेड्डी यांचे विजयवाडा परिसरात विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. त्यापैकी एक बॅनर कुत्र्याने फाडले.

या घटनेनंतर महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी दसारी उदयश्री यांनी विजयवाडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्र्यांचे बॅनर कुत्रा फाडत असल्याचे दिसत आहे.

या कुत्र्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याने आपण त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केल्याचे दसारी उदयश्री या महिलेने सांगितले. "मुख्यमंत्र्याचे बॅनर फाडण्यासाठी या कुत्र्याला प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई केली पाहिजे, तसेच हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करा," असे उदयश्री यांनी सांगितले.

या कुत्र्याने मुख्यमंत्र्याचे बॅनर फाडून राज्यातील ६ कोटी जनतेचा अपमान केला आहे. कुत्रा आणि संबधितांना अटक करण्याची मागणी उदयश्री यांनी पोलिसांकडे केली आहे. आता विजयवाडा पोलीस या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला अटक करणार का, असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहेत.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT