Karnataka Politics : माजी पंतप्रधानांचा लोकसभेसाठीचा प्लॅन ठरला ; या पक्षासोबत करणार आघाडी..

JDS Will Stand With Left Parties Former PM Devegowda : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं
 H. D. Kumaraswamy, H. D. Deve Gowda
H. D. Kumaraswamy, H. D. Deve GowdaSarkarnama
Published on
Updated on

JDS Will Stand With Left Parties Former PM Devegowda : माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर)चे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत (२०२४) कुणाला पाठिंबा देणार याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

जेडीएसचे प्रमुख देवेगौडा यांनी सांगितले की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. "महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा सादर करण्याबाबत विचार करावा, नवीन संसदभवनाच्या उद्धघाटनानंतर सर्वात पहिली चांगली गोष्ट त्यांनी हे विधेयक सादर करावे," असे देवेगौडा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

"केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यात राज्यातील महिला मतदारांची संख्याही पुढे आली आहे. यात ५० टक्के महिला मतदार आहेत. त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आरक्षण मिळाले पाहिजे," असे त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 H. D. Kumaraswamy, H. D. Deve Gowda
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

"नुकतेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. महिला आरक्षण विधेयक मांडण्यास सांगितले आहे. महिला आरक्षणावर मी पहिल्यांदा १९९६मध्ये आवाज उठवता होता," असे देवेगौडा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. येत्या लोकसभेसाठी डाव्या पक्षासोबत आघाडी करणार असल्याचे देवेगौडा यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटक राज्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष जनता दल सेक्युलरने (JDS) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात ९३ जणांची नावे आहेत. या यादीमुळे माजी पंतप्रधान एचडी.देवेगौडा परिवारातील वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

जेडीएसचे नेते कुमार स्वामी यांनी ही यादी प्रसिद्ध केली. आपल्या वहीनींना तिकीट न देण्याचा निर्धार त्यांनी पूर्ण करुन दाखवला आहे. कुमारस्वामींनी आपल्या वहीनींना तिकीट देण्याऐवजी एका सामान्य कार्यकर्त्यांला तिकीट देणं पसंत केलं आहे.

 H. D. Kumaraswamy, H. D. Deve Gowda
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा ; कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत आयोगाने घड्याळ...

कुमारस्वामींनी आपल्या पक्षासाठी या निवडणुकीत खूप मेहनत घेत असल्याचे दिसते. निवडणुकीची तारीख घोषित होण्याआधीच त्यांनी पहिली यादी जाहीर केली होती. हासन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या वहीनी भवानी रेवन्ना या इच्छुक होत्या. पण त्यांचे तिकीट एचडी कुमारस्वामी यांनी कापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com