Maharashtra Politics : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून राज्यात 27 वर्षांनंतर भाजपची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाच्या सत्तेला भाजपने सुरूंग लावला आहे. या निकालावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे.
अण्णा हजारे यांनी दिल्लीत मतदानापूर्वी आपला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. अण्णांनी केंद्रात यूपीएची सत्ता असताना दिल्लीत मोठे आंदोलन उभारले होते. याच आंदोलनातून केजरीवाल पुढे आले आणि नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत आपची स्थापना केली. अण्णांनी त्याला विरोध केला होता. तेव्हापासून ते केजरीवालांच्या भूमिकेला विरोध करत आहेत.
दिल्लीत आपचा पराभव होत असताना अण्णांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मीडियाशी बोलताना ते म्हणाले, केजरीवाल काही चांगलं करतील यावर मतदारांचा विश्वास नव्हता. केजरीवालांचे विचार शुध्द नाहीत. मी सातत्याने सांगत होतो, पण त्यांच्या डोक्यात हे आले नाही. मद्य धोरण का आले, पैशांसाठी.
निवडणूक लढताना उमेदवारांचे विचार, वागणूक शुध्द असणे, जीवन निष्कलंक असणे, हे गुण असतील तर मतदारांना विश्वास येतो, आपल्यासाठी कुणी काही करेल. हे मी सातत्याने सांगत होतो, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी थेट केजरीवालांना जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या आकडेरीवानुसार, सकाळी 11.45 वाजेपर्यंत दिल्लीत भाजपला 45 जागांवर तर आपला केवळ 25 जागांवर आघाडी होती. तर अरविंद केजरीवाल आठव्या फेरीअखेर 430 मतांनी पिछाडीवर होते. हा आपसाठी मोठा धक्का आहे. केजरीवालांच्या नवी दिल्ली मतदारसंघात केवळ पाच फेऱ्यांची मतमोजणी बाकी असून यामध्ये तरी केजरीवाल आघाडी घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.