Amritpal Singh Sarkarnama
देश

Amritpal Singh News : अमृतपाल सिंगकडून पोलिसांच्या हातावर पुन्हा तुरी; काही केल्या सापडेना !

Panjab News : नेपाळ सरकारलाही अमृतपालच्या हलचालींवर लक्ष देण्याचे आवाहन

सरकारनामा ब्युरो

Police Chase Amritpal : स्वयंघोषित खालीस्तानवादी व वारिस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पंजाब पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. तो नेपाळमार्गे परदेशात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी नेपाळ सरकारला अमृतपालच्या हलचालींवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

तत्पुर्वी, तो महाराष्ट्रात असल्याची माहिती होती. त्यानुसार राज्यातील यंत्रणानाही सतर्क होऊन कामाला लागल्या होता. आता मात्र तो पंजाबमधून बाहेर पडलाच नसल्याचे समोर आले आहे. अमृपालला पकडण्यासाठी शेकडो पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.

अमृतपाल होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात अमृतपाल लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. पोलिसांच्या कार्यवाहीची अमृतपालला कुणकुण लागलताच त्याने एका कारमधून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही. पोलीस मागे पडल्याचे पाहून अमृतपाल कार सोडून पसार झाला. त्याच्यासोबत त्याचा गुरू पापलप्रित सिंगही होता. सध्या ते दोघे एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार आता त्याच्या मागावर शेकडो पोलिसांची फौज तैनात केल्याची माहिती आहे.

अमृतपाल यांच्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अमृतपालला अद्याप पकडले नसल्याने उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित करत पंजाब सरकारवर ताशेरे ओढले आहेत. अमृतपालचे प्रतिज्ञापत्रात देशासाठी धोका असल्याचे वर्णन केलेले आहे. मग त्याला अद्याप का पकडण्यात आले नाही? ८० हजार पोलिसांचा फौजफाटा काय करतो? हे तुमच्या इंटिलिजन्सचे अपयश आहे? यासह अनेक प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केले होते.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी अमृतपालचे विविध छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. यात तो क्लीन शेव ते दाढी-पगडी अशी विविध छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. त्यात 'क्लिन शेव', दाढीसह, पगडी घातलेल्या विविध फोटोंचा समावेश आहे. एका व्हिडिओमध्ये तो दुचाकीवर बसलेला आहे, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो एका कारमधून जात असल्याचे दिसते.

अमृतपालला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने जॉर्जियामध्ये शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण दिल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. पंजाबमध्ये येण्यापूर्वी तो दुबईहून जॉर्जियाला गेला होता. आनंदपूर खालसा फोर्स (AKF) तयार करण्याची त्यांची तयारी देखील या प्रशिक्षणाचा एक भाग होता. पंजाबमध्ये अशांतता निर्माण करून देशातील वातावरण बिघडवण्याचे संपूर्ण प्रशिक्षण त्याला जॉर्जियामध्ये देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT