Prajwal Revanna Sarakarnama
देश

Sex Scandal Case : प्रज्वल रेवण्णाच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर आता अटक वॉरंट जारी!

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी जेडीयू खासदार प्रज्ज्वल रेवण्णाच्या विरोधात विशेष न्यायालयाने शनिवारी अटक वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट व्हिडीओ समोर आल्यानंतर हासन येथील लैंगिक शोषण प्रकरणाच्या मालिकेची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने अर्ज केल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्याची खात्री सूत्रांनी केली आहे.

26 एप्रिल रोजी कर्नाटकातील दुसऱ्या टप्प्यामधील लोकसभा निवडणूक संपल्यानंतर, लगेचच जेडीयू प्रज्ज्वल रेवण्णाने देशाबाहेर पळ काढला आहे. यानंतर इंटरपोलद्वारे त्याचा शोध घेण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीसही बजावली गेली होती. सध्या तो जर्मनीत असल्याचेही बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यना, प्रज्ज्वल रेवण्णा(Prajwal Revanna) व्हिडीओ प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. भाजपचे नेते आणि वकील देवराजे गौडा यांनी आरोप केला आहे की , कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि चार अन्य मंत्री हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णाच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या पेन ड्रायव्हच्या प्रसारात कथितरित्या सहभागी आहेत.

त्यांनी हाही आरोप केला की, शिवकुमार यांनी त्यांना भाजप(BJP) आणि मोदींना बदनाम करण्यासाठी व प्रज्ज्वल रेवन्नाशी निगडीत अश्लील व्हिडीओ प्रकरणी जनता दल(सेक्युलर)च्या एका मोठ्या नेत्याची प्रतीमा मलीन करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT