Sex Scandal Case : 'प्रज्ज्वल रेवन्नाचा VIDEO, डीके शिवकुमारांचे नाव अन् तब्बल 100 कोटींचं डील' ; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा!

Prajwal Revanna Case : जाणून घ्या, भाजपचे नेते आणि वकील देवराजे गौडा यांनी काय केला आहे आरोप?
Prajwal Revanna
Prajwal RevannaSarakarnama

Devaraje Gowda News : प्रज्ज्वल रेवन्ना व्हिडीओ प्रकरणात धक्कादायक गोष्टी समोर आले आहेत. भाजपचे नेते आणि वकील देवराजे गौडा यांनी शुक्रवारी आरोप केली की , कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि चार अन्य मंत्री हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या पेन ड्रायव्हच्या प्रसारात कथितरित्या सहभागी आहेत.

देवराजे गौडाला यौन शोषण प्रकरणी अटक केली गेली होती आणि या क्षणी ते ताब्यातच आहेत. त्यांनी हाही आरोप केला की, शिवकुमार यांनी त्यांना भाजप(BJP) आणि मोदींना बदनाम करण्यासाठी व प्रज्ज्वल रेवन्नाशी निगडीत अश्लील व्हिडीओ प्रकरणी जनता दल(सेक्युलर)च्या एका मोठ्या नेत्याची प्रतीमा मलीन करण्यासाठी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prajwal Revanna
J P Nadda News: काशी-मथुरा मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपची माघार? धार्मिक नव्हे तर 'या' मुद्द्यावर निवडणूक लढवणार; जे.पी. नड्डांचे संकेत

पोलिसांच्या ताब्यातील कालावधी संपल्यानंतर हासनच्या जिल्हा कारागृहातून घेऊन जाताना माध्यमांशी बोलताना देवराजे गौडा यांनी दावा केला. ' पे ड्राइव्ह प्रकरणात डी के शिवकुमार(DK Shivakumar) यांचा हाथ आहे आणि हे प्रकरण सांभाळण्यासाठी चार मंत्री एन.चालुवरायास्वामी, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खरगे आणि एक अन्यमंत्र्याची टीम बनवली गेली होती. असे भाजप, पंतप्रधान मोदी आणि जेडीएसच्या एक मोठ्या नेत्याला बदनाम करण्यासाठी केले आहे. मला 100 कोटी रुपयांची ऑफर दिली गेली होती.'

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. देशभरातील प्रचारसभांमध्ये काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांतील नेत्यांकडून या प्रकरणावरून भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर(Narendra Modi) निशाणा साधला जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीएसचे प्रमुख, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू खासदार प्रज्वल रेवन्ना हे आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच ते परदेशात गेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Prajwal Revanna
Swati Maliwal Case: आधी मालीवाल यांना मारहाण नंतर फरार, आता केजरीवालांच्याच घरातून केली माजी सचिवाला अटक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com