सचिन देशपांडे
Shree Ram Idol : रामानंद सागर यांच्या दूरदर्शनवरील जगविख्यात ‘रामायण’ या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल यांना आजही श्रीराम स्वरुपात पुजले जाते. ते विमानतळावर असो किंवा जगात कुठेही त्यांना श्रीराम म्हणून मान्यता मिळाली आहे. श्रीराम भक्त त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय राहात नाहीत. अयोध्येतील प्रभु श्रीरामाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांचे देखील प्रथम नाव ‘अरुण’च असल्याने हा दुर्मिळ योग कसा काय जुळला? असा प्रश्न उपस्थित होतो.
म्हैसूरमधील प्रसिद्ध शिल्पकारांच्या पाच पिढ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले अरुण योगीराज हे सध्या देशातील सर्वांत चर्चेतील शिल्पकार आहेत. अरुण यांच्या कौशल्यातून अनेक शिल्प घडविल्या गेली आहेत. अनेक ठिकाणी अरुण यांनी साकारलेली देवी, देवतांच्या मूर्ती या आदर्श मूर्ती म्हणून पाहण्यात येतात. मूर्ती घडविताना सर्वस्व अर्पण करण्याची त्यांची कृती आणि पाच पिढ्यांचा अनुभव त्यांना यशस्वी शिल्पकार म्हणून जगासमोर आणतो.
अरुणचे वडील योगीराज हे देखील कुशल शिल्पकार आहेत. त्यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी यांना म्हैसूरच्या राजाने संरक्षण दिले होते. याच पिढीतील अरुण योगीराज यांचाही लहानपणापासूनच कोरीव कामात सहभाग होता. एमबीए झाल्यानंतर त्यांनी काही काळ खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु शिल्पकलेच्या व्यवसायातील कौशल्यापासून ते दूर गेले नाहीत. त्याच्यामध्ये जन्मजात शिल्पकला त्यांचे जीवन बदलण्यात मोलाची ठरली. तब्बल 16 वर्षांपासून या श्रेत्रात ते कार्यरत आहेत.
अरुण यांच्या शिल्प साधनेचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अरुण यांनी केदारनाथ येथे शंकराचार्यांची मूर्ती तयार केली होती. त्याच बरोबर दिल्लीतील इंडिया गेट स्थित सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती अरुण यांनी साकारली होती. या दोन्ही मूर्तींचे कौशल्य आणि प्रतिभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले होते. सुभाषचंद्र बोस यांच्या मूर्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले होते. सुभाषचंद्र बोस यांचा 30 फुटांचा पुतळा आकर्षक असाच झाला आहे. अरुण यांनी सुभाषचंद्र बोस यांचा दोन फूट उंच पुतळा पंतप्रधानांना भेट दिला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदी शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्तीही साकारली होती. म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकट्टे येथील 21 फूट उंच हनुमान पुतळा, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 15 फूट उंच पुतळा, म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांची पांढरा अमृतशिला पुतळा, नंदीची सहा फूट उंच अखंड मूर्ती त्यांनी साकारली आहे.
कोफी अन्नान यांनी अरुणच्या कार्यशाळेत भेट देत त्यांचे कौतुक केले होते. अरुण यांची साकारलेले पंचमुखी गणपती, भगवान महाविष्णू, भगवान बुद्ध, नंदी, स्वामी यांचे शिल्पे विविध मंदिरांमध्ये स्थापित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अरुण योगीराज कडून साकारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करेल काय, अशी विचारणा आता होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.