BJP Sarkarnama
देश

Assembly Elections 2024 : भाजपने निवडणुकीआधीच उधळला गुलाल; अरुणाचलमध्ये पाच उमेदवार बिनविरोध  

BJP Political News : अरुणाचल प्रदेशातही होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाच उमेदवारांविरोधात एकही अर्ज आला नाही. त्यामुळे भाजपने निवडणुकीआधीच मैदान मारले आहे.

Rajanand More

Arunachal Pradesh News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचा पहिली खूष खबर आली आहे. लोकसभेसोबतच अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) होत आहे. त्यासाठी 19 एप्रिलला मतदान आहे. पण त्यापूर्वीच भाजपचे एक-दोन नव्हे तर पाच उमेदवार बिनविरोध विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांच्या मतदारसंघात आता निवडणूकच होणार नसल्याने भाजपची विजयी सुरुवात झाली आहे.

अरुणाचलमध्ये (Arunachal Pradesh) विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 19 एप्रिलला मतदान असून, कालपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. पण काही मतदारसंघांमध्ये विरोधकांकडून उमेदवारी अर्जच दाखल करण्यात आले नाहीत. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू (CM Pema Khandu) यांचाही मतदारसंघ आहे. त्यामुळे खांडू यांच्यासह भाजपचे (BJP) अन्य चार उमेदवारही बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अरुणाचलमध्ये 60 जागांसाठी एकूण 197 अर्ज आले आहेत. त्यांची आज छाननी होणार आहे. तर 30 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री खांडू हे मुक्तो मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात विरोधी पक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे प्रवक्ते तेजी नेचा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह पाच उमेदवार ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तिथे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही. त्यामुळे हे पाचही उमेदवार बिनविरोध विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 55 जागांसाठी मतदान होईल.

लोकसभेच्या दोन जागांसाठीही निवडणूक

अरुणाचल प्रदेशात लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) दोन जागांसाठीही 19 एप्रिलला मतदान होणार आहे. अरुणाचल पश्चिम मतदारसंघात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने (Congress) प्रदेशाध्यक्ष नबाम तुकी यांना उमेदवारी दिली आहे, तर अरुणाचल पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार तापिक गाओ यांना काँग्रेसचे बोसीराम सिरम टक्कर देतील.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT