Money Laundering Case : सोरेन, केजरीवालांनंतर आणखी एक मुख्यमंत्री अडचणीत; ‘ईडी’कडून मुलीवर गुन्हा

Pinarayi Vijayan News : मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका कंपनीकडून मुलीच्या कंपनीच्या खात्यात बेकायदेशीरपणे पैशांचे व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
Hemant Soren, Arvind Kejriwal, Pinarayi Vijayan
Hemant Soren, Arvind Kejriwal, Pinarayi VijayanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या जेलमध्ये आहेत. त्यानंतर आता केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने त्यांची मुलगी वीनासह कंपनीवर मनी लाँर्डिंग कायद्यांतर्गत गुन्हा (Money Laundering Case) दाखल करण्यात आला आहे. बँक खात्यात बेकायदेशीर व्यवहार झाल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला आहे.

केंद्र सरकारकडून गंभीर गुन्हे तपास कार्यालयाला वीना विजयन (Veena Vijayan) यांच्या कंपनीतील व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या कार्यालयाने ईडीकडे (ED) तक्रार केली होती. त्यानुसार ईडीने वीना यांच्यासह त्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

Hemant Soren, Arvind Kejriwal, Pinarayi Vijayan
Lok Sabha Election 2024 : आम्ही गुलाम नाही! काँग्रेसचे सात आमदार राजीनाम्याच्या तयारीत

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील (Kerala) कोची येथील कोचीन मिनरल्स या खासगी कंपनीकडून एक्सालॉजिक सोल्युशन्य या कंपनीशी 1 कोटी 72 लाख रुपयांचा व्यवहार केला. एक्सालॉजिक ही कंपनी वीना यांची आहे. हा व्यवहार 2017 आणि 2018 मध्ये झालेला आहे. कंपनीकडून कोणतीही सेवा पुरवलेली नसताना व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

कोणतीही सेवा पुरवली जात नसताना सीएमआरएलकडून एक्सालॉजिकला दर महिन्याला पैसे पाठवले जात होते. वीना विजयन यांचे एका मोठ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याने हा व्यवहार सुरू होता, असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, या प्रकरणी मागील महिन्यातच एक्सालॉजिक कंपनीकडून ‘एसएफआयओ’च्या तपासाविरोधात कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High Court) धाव घेतली होती. मात्र, कोर्टाकडून ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री पी. विजयन (Pinarayi Vijayan) यांनी जानेवारी महिन्यात केरळ विधानसभेत या प्रकरणाविषयी भाष्य केले होते. मुलीने त्याच्या आईच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून कंपनी सुरू केली आहे. त्यामुळे माझ्यासह कुटुंबावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावरच ईडीने गुन्हा दाखल केल्याने आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

सोरेन आणि केजरीवाल तुरुंगात

मुख्यमंत्रिपदी असताना हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची चौकशी सुरू झाली होती. ईडीने अटक करण्यापूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला. कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. तर दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना (Arvind Kejriwal) ईडीने मागील आठवड्यात अटक केली आहे.  

R

Hemant Soren, Arvind Kejriwal, Pinarayi Vijayan
Lok Sabha Election 2024 : ‘आप’ला मोठा धक्का; लोकसभेतील एकमेव खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com