Lok Sabha Election 2024 : ‘आप’ला मोठा धक्का; लोकसभेतील एकमेव खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश

AAP Lok Sabha Candidate : सुशीलकुमार रिंकू यांना जालंधरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला धक्का बसला आहे.
Sushil Kumar Rinku, Sheetal Rinku
Sushil Kumar Rinku, Sheetal RinkuSarkarnama
Published on
Updated on

Punjab News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत आम आदमी पक्षाला आज दुहेरी धक्का बसला आहे. पंजाबमधील आपचे एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आमदार शीतल अंगुरल यांनीही आज आपची साथ सोडली. विशेष म्हणजे रिंकू यांना आपकडून उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.

रिंकू (Sushil Kumar Rinku) हे जालंधर मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मागील वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराचा पराभव केला होता. त्यावेळी ते काँग्रेसमधून आपमध्ये दाखल झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षांतर करत आपला राम राम ठोकला आणि भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.

Sushil Kumar Rinku, Sheetal Rinku
Lok Sabha Election 2024 : आम्ही गुलाम नाही! काँग्रेसचे सात आमदार राजीनाम्याच्या तयारीत

मागील निवडणुकीत रिंकू यांचा 58 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला होता. आता भाजपकडून त्यांना या मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते. याच लोकसभा मतदारसंघातील जालंधर पश्चिमच्या आपचे (AAP) आमदार शीतल अंगुरल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने आपला धक्का बसला आहे, तर भाजपची ताकद वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमध्ये कालच काँग्रेसचे लुधियानाचे विद्यमान खासदार रणवीत बिट्टू यांनी प्रवेश केला आहे. भाजपने राज्यात एकला चलोची भूमिका जाहीर केल्यानंतर काही तासांतच बिट्टू यांचा पक्षप्रवेश झाला. ते माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. त्यांची 1995 मध्ये चंदीगड येथे हत्या करण्यात आली होती.

पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण 13 जागा असून, सर्व जागांवर अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यात मतदान होणार आहे. एक जूनला मतदान असून, चार जूनला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भाजपने अकाली दलासोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतर पक्षांतील बड्या नेत्यांकडे भाजपने मोर्चा वळवल्याचे दिसते. राज्यात भाजपची फारशी ताकद नाही. त्यामुळे इतर पक्षांतील आजी-माजी लोकप्रतिनिधींना पक्षात घेतले जात असल्याची चर्चा आहे.

R

Sushil Kumar Rinku, Sheetal Rinku
Lok Sabha Election 2024 : वरुण गांधींचं ठरलं! सुलतानपूरमध्ये प्रचार करणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com