Arvind Kejriwal Politics : आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांना भेटून त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. अरोरा हे 'आप'चे राज्यसभा खासदार होते. मात्र, पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी 'आप'कडूनच लुधियाना पश्मिम विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण यांचा पराभव केला.
अरोरा हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. ते आता पंजाब विधानसभेचा आमदार असणार आहेत. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर खासदार म्हणून कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे अरोरा यांच्या जागेवर खासदार म्हणून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अरविंद केजरीवाल हे राज्यसभेवर जाणार, अशा चर्चा सुरू असतानाच स्वतः केजरीवाल यांनी आपण राज्यसभेवर जाणार असल्याच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. अरोरा यांच्यावर जागेवर आपण राज्यसभेत जाणार नाही. तेथे कोणत्या नेत्याला पाठवायचे हे पक्षातील नेतेच ठरवतील, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
संजीव अरोरा हे विधासभा निवडणूक लढण्यास फारसे उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत होते. पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मैदानात उतरावे यासाठी स्वतः अरविंद केजरीवाल यांनी प्रयत्न केले. तसेच विजयी झाल्यानंतर त्यांना पंजाब सरकारमध्ये मंत्री करण्याचे आश्वासन देखील देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे अरोरा लवकरच पंजाब सरकारमध्ये मंत्री झालेले पाहण्यास मिळतील, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.