कर्नाटकात ऑपरेशन लोट्स? सिद्धरामय्यांनी चर्चांनाच ब्रेक लावला; म्हणाले,'मी आणि शिवकुमार..., कोणी काहीही...'

Congress vs BJP Karnataka : मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हैसूर दसऱ्याचे उद्‍घाटन करणार नाहीत, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या विधानावर सिद्धरामय्या यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, भाजप खोटे बोलण्यात पटाईत असल्याचा टोला लगावला आहे.
D. K. Shivakumar & Siddaramaiah
D. K. Shivakumar & SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेच समोर आले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात मतभेद असल्याने ते 100 हून अधिक आमदार घेऊन भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर कर्नाटकात ऑपरेशन लोट्ससह मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधान आले होते. यादरम्यान आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या चर्चांना पूर्णविराम देत भोजपवर जोरदार पलटवार केला आहे.

सिद्धरामय्या यांनी, कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत राहणार असून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आपल्याबरोबरच आहेत. त्यांचा हात आपल्या हातातच असल्याचे सांगितले आहे. ही घोषणा त्यांनी म्हैसूर येथे विमानतळावर एकीचे प्रदर्शन करताना शिवकुमार यांना सोबत घेऊन केली. यामुळे आता काँग्रेसचे संकटमोचक काँग्रेसबरोबर असल्याचेही समोर आले आहे. यामुळे कर्नाटकात आलेले राजकीय भूकंपाच्या बातम्याही शांत झाल्या आहेत.

सिद्धरामय्या यांनी, राज्यातील काँग्रेस सरकार लवकरच पडेल आणि विधानसभेसाठी मध्यावधी निवडणुका होतील, या भाजप नेत्यांच्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपवाल्यांना हे सतत वाटतं असतं, की आपण सत्तेत येऊ, भाजप खोटे बोलण्यात पटाईत असल्याचा टोला देखील यावेळी सिद्धरामय्या यांनी लगावला. तसेच त्यांनी काँग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील असेही ग्वाही दिली आहे.

D. K. Shivakumar & Siddaramaiah
Siddaramaiah on Caste Census: केंद्रीय जातीय जनगणनेपेक्षा आमच्या पुनर्सर्व्हेक्षणात सामाजिक न्याय; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकारला डिवचलं

यावेळी सिद्धरामय्या म्हणाले, ‘मी आणि शिवकुमार एक आहोत. एक राहू. कोणी काहीही म्हटले तरी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पण, भाजप आमच्यात अलबेल असल्याचा खोटा प्रचार करत आहे. कोणी काहीही म्हटले, तरी मी आणि शिवकुमार एक असल्याचा पुनर्रउच्चार केला आहे.

सिद्धरामय्या यांनी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या विधानाचा देखील खरपूस समाचार घेतला असून म्हैसूर दसऱ्याचे उद्‍घाटन करणार नाहीत, असे ते म्हणत होते. पण भाजप हे खोटे बोलण्यात पटाईत असून आता जनताच ठरवेल की मी दसऱ्याचे उद्‍घाटन करेन की नाही.? तर या शंका आणण्याचे कोणतेच कारण नसून मीच दसऱ्याचे उद्‍घाटन करणार असाही सिद्धरामय्या यांनी दावा केला आहे.

D. K. Shivakumar & Siddaramaiah
CM Siddaramaiah : 'मुख्यमंत्र्यांनी स्वतः घेतली 500 कोटींची लाच?', सिद्धरामय्या पुन्हा गोत्यात

यावेळी त्यांनी माजी मंत्री श्रीरामुलू यांच्यावरही टीका करताना, काँग्रेस सरकार लवकरच पडेल असे ते म्हणत होते. पण श्रीरामुलू किती निवडणुका हरले आहेत, हे आधी त्यांनी पहावं. जो विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांमध्ये हारला आता असा माणूस सरकारचा राहिल की जाईल असा अंदाज लावत असेल तर काय बोलावं असाही टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com