Arvind Kejriwal sarkarnama
देश

Arvind Kejriwal : इंडिया आघाडीत फूट? अरविंद केजरीवाल यांच्या 'या' दाव्याने खळबळ...

Political News :भाजपसह काँग्रेसवर ही केजरीवलांची टीका

सरकारनामा ब्यूरो

Panjab : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला. महत्वाची तीन राज्य गमवाल्याने काँग्रेसचे इंडिया आघाडीतील वजन घटले आहे. या आघाडीची बैठक १९ डिसेंबरला होणार आहे. मात्र, त्यापुर्वीच दिल्लीचे मुख्यंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी पंजाबमधील लोकसभेच्या सर्व १३ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

पंजाबमधील जनतेला केजरीवाल यांनी लोकसभेतील १३ पैकी १३ जागी निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच काँग्रेस (Congress), भाजप तसेच अकाली दल या पक्षांवर जोरदार टीका केली. आप सरकारच्या काळात २४ तास वीज मिळत आहेत. आपवर टिका केली जाते की योजनांसाठी ते पैसे कोठून आणतात. मात्र, जे काम १०० रुपयांचे होते ते काम इतर पक्षांनी १० रुपयांमध्ये करत भ्रष्टाचार केला. मात्र, १० रुपयांचे काम आप पक्ष आठ रुपयांमध्ये करतो, असे उत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिले.

इंडिया आघाडीला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार की नाही याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. विपश्यना करण्यासाठी केजरीवाल जाणार असल्याने ते १३ दिवस उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे ते इंडिया आघाडीच्या बैठकीला नसतील, अशी चर्चा आहे. मात्र, अजूनही केजरीवाल यांच्याकडून ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, हे स्पष्ट करण्यात आले नाही.

इंडिया आघाडी (India alliance) मध्ये प्रामुख्याने आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून मतभेद असल्याचे दिसून येते. दिल्ली, गुजरात, पंजाब या राज्यांमध्ये आपली चांगली ताकद असल्याने येथे जास्त जागांची मागणी 'आप'कडून होताना दिसून येते. तर, काँग्रेस देखील येथे आपली ताकद असल्याने येथे कमी जागांवर लढण्यास तयार नाही. मात्र, चर्चेनंतर येथील तिढा सुटेल, अशी आशा दोन्ही पक्षातील काही नेते व्यक्त आहेत.

केंद्र सरकार हे आपच्या कामांमध्ये अडथळा आणत आहेत. शहीद जवानांनाच्या परिवाराला पंजाबमध्ये आप सरकारकडून एक कोटी रुपयांची मदत केली जाते. मात्र, भाजप आणि काँग्रेसच्या काळात शहिद जवानांचा परिवार दुर्लक्षित राहत असल्याचा टीका देखील अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT