Lok Sabha Security Breach : संसद घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झाने वडिलांकडे मागितले होते 7 लाख रुपये; काय होता प्लॅन?

Lalit Jha News : बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील ललित झा याच्या मूळगावी रामपूर उदय येथे जाऊन बहेरा पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची सुमारे तासभर चौकशी केली.
Lalit Jha
Lalit JhaSarkarnama
Published on
Updated on

Patana News : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा याने काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांकडे ७ लाख रुपये मागितल्याचे चौकशीत समोर आले आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील ललित झा याच्या मूळगावी रामपूर उदय येथे जाऊन बहेरा पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांची सुमारे तासभर चौकशी केली. त्यावेळी ललितने वडिलांकडे सात लाख मागितल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे ललितच्या अटकेची माहितीही शुक्रवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी फोनवरून दिली. त्या अगोदर आम्हाला काहीही माहिती नव्हते, असा दावाही त्याचे वडील देवानंद झा यांनी केला. (Parliament intrusion mastermind Lalit Jha had asked his father for seven lakh rupees)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दोघांनी संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. त्यांनी सभागृहात स्मोक स्कॅंडलही फोडले होते. संसद घुसखोरी प्रकरणात सागर, विक्रम, ललित, मनोरंजन, नीलम अशी सहा जणांची नावे समोर आली आहेत. त्यातील ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lalit Jha
Kopardi Incident : ‘कोपर्डीची घटना ही मराठ्याच्या हृदयाला लागलेला बाण; आरोपीला फाशी द्या’

ललित झा याचे वडील देवानंद यांची बहेरा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर चौकशी केली. या चौकशीबाबत दरभंगाचे पोलिस अधिकारी आकाश कुमार यांनी सांगितले की, संसदेतील घुसखोर प्रकरणाच्या तपासासाठी अद्याप एसआयटीची स्थापना करण्यात आलेली नाही. बहेरा पोलिस ठाण्याच्या पाच सदस्यीय पथकाने रामपूर उदय गावात जाऊन ही माहिती घेतली आहे. पोलिसांनी पहिल्यांदा ललितचे वडील देवानंद झा यांचा मोबाईल ताब्यात घेतला. त्यातील काही फोटो आणि व्हिडिओ माहिती त्यांनी घेतली. ललित याच्या चुलत्यांचे आणि इतर नातेवाईकांचे फोन नंबरही घेण्यात आले आहेत.

ललितला नीट परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ललित याला सात लाख रुपयांची गरज होती. नाव नोंदणीसाठी तातडीने तीन लाख रुपये भरावे लागतील, असेही त्याने वडिलांना सांगितले होते. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिशन घेण्यासाठी त्याने वडिलांकडे सात लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने ललितच्या वडिलांनी पैसे द्यायला नकार दिला होता.

Lalit Jha
Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी; जरांगेंची सरकारकडे मागणी

कोलकता येथे पूजापाठ करून ते कसा तरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. संसदेत घडलेल्या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी फोन करून आपल्याला दिली. तसेच, ललित झा याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतरच त्यांना या घटनेची माहिती मिळाली, असे ललितचे वडिल देवानंद झा यांनी सांगितले.

ललितशी आमचे दहा डिसेंबर रोजी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी देवानंद झा यांनी आपण गावी जात असून तूही गावाकडे ये असे सांगितले होते. मात्र, गावाकडे येण्यास ललितने नकार दिला होता, असेही देवानंद झा यांनी स्पष्ट केले.

Lalit Jha
Antarwali Sarati Meeting : महाजनांनी जरांगेंना काय सांगितले...‘आता देवसुद्धा मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखू शकत नाही’

संसदेतील घुसखोरी प्रकरणात आपला मुलगा ललित निर्दोष आहे. त्याच्यावर जोर जबरदस्ती केली तर ते चुकीचे होणार आहे. याबाबत पोलिस अधिकारी अवकाश कुमार यांनी सांगितले की, ललित झा याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून आणखी काही सूचना आली तर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Lalit Jha
Solapur Politics : होय, तीन निवडणुकांत भाजपला मदत केली; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com