Uddhav thackeray Arvind Kejriwal Narendra Modi  sarkarnama
देश

Arvind Kejriwal : ‘मोदी पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकतील’, अरविंद केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

Loksabha Election : पुढील वर्ष सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षीचे होत आहेत. मग मी भाजपला विचारतो की त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा दावेदार कोण आहे? असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

Roshan More

Political News : कथित दारु घोटाळ्याच्या आरोपातून जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामीनावर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सर्वोच्च न्यायलायने अरविंद केजरवाल यांना निवडणूक प्रजचार करण्याची परवानगी दिली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर Narendra Modi कठोर शब्दात प्रहार करत मोदी पुन्हा सत्तेत आले तर विरोधी पक्षातील कोणत्या नेत्यांना तुरुंगात टाकणार याची यादीच सांगितलं.

'तुम्ही माझ्याकडून एफिडेविट लिहून घ्या, हे निवडणूक जिंकले तर उद्धव ठाकरे Uddhav thackeray ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव आणि स्टॅलिन तुरुंगात दिसतील. पंतप्रधान मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायचे आहे.', असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. यांनी भाजपमधील नेत्यांना देखील सोडले नाही. मनोहरलाल खट्टर, वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान यांचे राजकारण मोदींनी संपवले, असे देखील केजरीवाल Arvind Kejriwal म्हणाले.

वयाच्या मुद्द्यावरून मोदींनी मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, सुमित्रा महाजन यांचे राजकारण संपवले. पुढील वर्ष सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षीचे होत आहेत. मग मी भाजपला विचारतो की त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा दावेदार कोण आहे? योगी आदित्यनाथ यांना डावलून अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल, असा दावा देखील केजरीवाल यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला केवळ 220 जागा

400 पारच्या घोषणा भाजप देत असले तरी भाजपला 200 जागाच मिळतील असा दावा केजरीवाल यांनी केला. सट्टा बाजारानुसार भाजपला 220 जागांवरच जिंकत आहे. इंडिया आघाडिचे सरकार सत्तेत येणार, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT