Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मद्यधोरण अंमलबजावणी प्रकरणी आत्तापर्यंत तब्बल 9 समन्स पाठवल्यानंतर आता हायकोर्टाने केजरीवालांची अटकेपासून संरक्षण तात्पुरता दिलासा देण्याची मागणी फेटाळून लावली होती. आता दोन तासांच्या चौकशीनंतर अखेर केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
अटकेपासून संरक्षण फेटाळून लावल्याने उच्च न्यायालयाचा हा निर्णय मोठा केजरीवालांना झटका मानला जात होता. आता केजरीवालांवर अटक करण्यात आली आहे. ईडीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. नऊ समन्सनंतरही चौकशीला न जाणं केजरीवालांना महागात पडली आहे. आता दोन तासांच्या चौकशीनंतर केजरीवालांना अटक करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता कुठलेही समन्स बजावण्यात येऊ नये. तसेच आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. यादरम्यान अटकेपासून संरक्षण मिळावं, अशी विनंती अरविंद केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) वतीने दिल्ली न्यायालयात करण्यात आली होती.
मात्र न्यायालयाने सद्यःस्थितीत अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत केजरीवाल यांना दंडात्मक कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता केजरीवालांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली कथित मद्य घोटाळा (Liquor policy case) प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रकरण सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज 17 मार्च रोजी नववे समन्स पाठवण्यात आले होते.
नवव्या समन्सनंतरही ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. याचवेळी ईडीने पाठविलेली सर्व समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. तसेच केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी एक याचिका दाखल केली होती. मात्र आज अखेर केजरीवालांना अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.