Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार; हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता ईडीची टीम घरी दाखल

Delhi HC refuses to grant Arvind Kejriwal protection in liquor policy case : आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार असून, आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं, अशी विनंती केजरीवालांच्या वतीने दिल्ली न्यायालयात करण्यात आली होती.
Arvind Kejriwal News
Arvind Kejriwal NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकारच्या मद्यधोरण अंमलबजावणी प्रकरणी आत्तापर्यंत तब्बल 9 समन्स पाठवल्यानंतर आता हायकोर्टाने केजरीवालांची अटकेपासून संरक्षण तात्पुरता दिलासा देण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

उच्च न्यायालयाचा हा निर्णय मोठा झटका मानला जात आहे. आता केजरीवालांवर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीचे पथक केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. समन्सनंतरही चौकशीला न जाणं केजरीवालांना महागात पडण्याची शक्यता आहे.

Arvind Kejriwal News
Ramtek Lok Sabha Constituency : रामटेक सोडायला तयार नाही शिंदे गट, भाजप चाचपणीत व्यस्त !

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आता कुठलेही समन्स बजावण्यात येऊ नये. तसेच आपण चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. यादरम्यान अटकेपासून संरक्षण मिळावं, अशी विनंती अरविंद केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) वतीने दिल्ली न्यायालयात करण्यात आली होती. पण न्यायालयाने सद्यःस्थितीत अंतरिम दिलासा दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत केजरीवाल यांना दंडात्मक कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केजरीवालांना आपण ईडी चौकशीला हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल हे शुक्रवारी ईडीसमोर हजर होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

दिल्ली कथित मद्य घोटाळा (Liquor policy case) प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज 17 मार्च रोजी नववे समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. याचवेळी ईडीने पाठविलेली सर्व समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. तसेच केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी एक याचिका दाखल केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याच याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी पार पडली. या वेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी निवडणुका तोंडावर आहेत आणि आता समन्स बजावू नका, अशी विनंती करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने तुम्ही ईडीच्या (ED) समन्सला काही उत्तर दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला. या वेळी प्रत्येक नोटिशीला उत्तर दिले आहे.

पण याचवेळी मला या नोटिसा कोणत्या आधारे दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री असल्याने की आम आदमी पक्षाचा प्रमुख असल्यामुळे नोटिसा बजावल्या आहेत? असे सवालही केजरीवालांच्या वतीने उपस्थित करण्यात आले. माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. मी चौकशीला येण्यास आणि तपासात सहकार्य करायला तयार आहे. मी व्हर्च्युअली हजर होईल. मला अटकेपासून संरक्षण हवंय, अशी विनंती केजरीवाल यांच्यातर्फे वकिलांनी केली होती.

R

Arvind Kejriwal News
MPSC Exam News : मोठी बातमी|MPSC ने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; नवे वेळापत्रक कधी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com