Arvind Kejriwal News Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : भ्रष्टाचाराचे आरोप भाजपकडून अन् केजरीवालांनी काँग्रेस सरकारचीही लावली चौकशी

Congress : केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांच्या काळातील कामाचे ऑडिट करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

Rajanand More

Delhi Jal Board : भाजपकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. आता भाजपने दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर रान उठवले आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे कॅग मार्फत ऑडिट करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामध्ये काँग्रेस सरकारच्या काळातील कामाचेही ऑडिट होणार आहे.

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित (Sheela Dixit) यांच्या काळातील कामाचे ऑडिट करणार असल्याचेही जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केजरीवाल यांनी जल बोर्डाचे १५ वर्षांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. केजरीवाल हे डिसेंबर २०२३ पासून मुख्यमंत्री आहेत. याचा अर्थ २००८ ते २०१३ या कालावधीतीलही ऑडिट होणार आहे. त्यावेळी शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या.

माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, विरोधकांकडून काही आरोप केले जात आहेत. या ऑडिटमधून सर्वकाही स्पष्ट होईल. कुणी चुकीचे केले असेल तर त्यांना शिक्षा केली जाईल. काही अनियमितता नसेल तर सत्य समोर येईल. त्यामुळे मागील १५ वर्षांचे कॅग ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्याचे केजरीवार यांनी स्पष्ट केले.    

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निधी दिला जात नसल्याने दिल्लीवासियांना पाणी मिळण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त करून केजरीवाल म्हणाले, निवडून आलेल्या सरकारशी संपूर्ण प्रशासन बांधील नसले सरकार चालविणे अशक्य होते. जल बोर्डाला निधी देण्यात न आल्याने अनेक संपूर्ण दिल्लीला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केजरीवालांचा ‘क्राईम मास्टर गोगो’ हा उल्लेख करत टीका केली होती. ते म्हणाले होते की, जल बोर्डामध्ये अनेक घोटाळे झाले आहेत. पण केजरीवाल भ्रष्टाचाराविषयी एक शब्दही बोलत नाहीत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप भाटिया यांनी केला आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT