Rajasthan Election : राजस्थानमध्ये पुन्हा निवडणुकीचे वारे; एका मतदारसंघासाठी तारखा जाहीर

Election News : काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे निवडणूक स्थगित केली होती.
Rajasthan Politics
Rajasthan Politics Sarkarnama
Published on
Updated on

Election Commission of India : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला धोबीपछाड देत पुन्हा सत्ता मिळवली आहे. राज्यात 200 पैकी 199 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर या मतदारसंघाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी निवडणूक कार्य़क्रम जाहीर केला असून पाच जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

करणपूर (Karanpur) मतदारसंघात काँग्रेसने (Congress) विद्यमान आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांना तिकीट दिले होते. पण मतदानाच्या दहा दिवस आधी 15 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. ब्रेन अॅटॅकनंतर त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यामुळे आयोगाकडून 25 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान स्थगित करण्यात आले होते.

Rajasthan Politics
BJP News : सत्ता मिळताच माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप; सरकारी अधिकाऱ्यांना दिली तंबी

आता आयोगाने पुन्हा या मतदारसंघासाठी निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पाच जानेवारी 2024 रोजी मतदान होणार असून आठ जानेवारीला मतमोजणी होईल. इच्छुकांना 12 ते 19 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. तर 20 तारखेला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी 22 डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपने राज्याच्या निवडणुकीत बंपर यश मिळवले आहे. त्यामुळे करणपूर मतदारसंघात होणारी निवडणूकीमुळे सत्तेच्या गणितावर काहीही परिणाम होणार नाही. या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व मानले जाते. विद्यमान आमदारांच्या निधनामुळे ही निवडणूक होत आहे.

(Edited By - Rajanand More)

Rajasthan Politics
Rahul Gandhi : प्रणव मुखर्जींचा मंत्री होण्याचा सल्ला, पण राहुल गांधींनी...! मुलगी शर्मिष्ठांच्या पुस्तकात अनेक खुलासे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com