Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal Resignation : ..तर अशी ठरली केजरीवालांच्या राजीनाम्याची पूर्ण स्क्रिप्ट? ; प्लॅनिंग, मीटिंग अन् मग..!

Mayur Ratnaparkhe

Aam Aadmi Party Politics : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. अशी घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. केजरीवालांचया या घोषणेनंतर सर्वचजण याचा अंदाज लावत आहेत की, दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोणा असेल? परंतु आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, अखेर असं काय घडलं की केजरीवालांनी एकदम मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. खरंतर त्यांनी हा मोठा निर्णय अचानक घेतलेला नाही.

अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याचा निर्णय आम आदमी पार्टीच्या(AAP) वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतच घेतला गेला होता. केजरीवाल यांनी या बैठकीतच सांगितले होते की, ते राजीनामा देण्यास जात आहेत. यानंतर मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी झालेल्या दुसऱ्या बैठकीत केजरीवालांच्या राजीनाम्याबाबत अंतिम रणनीती आखली गेली. सूत्रांचे म्हणणे आहे की अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून तुरुंगातच राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर हेदेखील ठरवले होते की तुरुंगात राहून राजीनामा द्यायचा नाही, तर बाहेर येवून राजीनामा द्यायचा.

यानंतर रविवारी अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना, म्हटले की ते दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. केजरीवाल म्हणाले, मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा भाजपवाल्यांनी विचारले की केजरीवालांनी आपल्या पदाचा राजीनामा का नाही दिला? त्यांनी विरोधाताली सर्व लोकांविरोधात खटले दाखल केले. आज दिल्लीसाठी खूपकाही करू शकलो, कारण आम्ही प्रामाणिक आहोत. हे लोक आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात, कारण ते प्रामाणिक नाहीत.

पुढे केजरीवाल म्हणाले की, आज मी 'आप की अदालत'मध्ये आलो आहे. जनतेच्या न्यायालयात आलो आहे. तुम्हाला विचारण्यास आलो आहे की, तुम्ही केजरीवालला प्रमाणिक मानतात की गुन्हेगार मानतात?. दोन दिवसांनंतर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. मी तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसणार नाही, जोपर्यंत जनता आपला निर्णय देणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय दिल्यानंतरच मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसेन. तुम्हाला वाटत असेल की आती मी असं का बोलत आहे. त्यांनी माझ्यावर आरोप केला की केजरीवाल चोर आहे, भ्रष्टाचारी आहे, मी या कामांसाठी नव्हतो आलो.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT