Arvind Kejariwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

Arvind Kejariwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
Arvind Kejariwal
Arvind KejariwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दिल्लीसह देशातील वातावरण ढवळून निघालं आहे.

मी येत्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असून जोपर्यंत जनता आपला निकाल देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) सहा महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने त्यांच्यावर अनेक बंधने देखील घातली आहेत.

अशातच आता त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवाय केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा (Delhi) नवीन मुख्यमंत्री कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

केजरीवाल म्हणाले, "मी आता जनतेच्या न्यायालताय आलो आहे. तुम्ही मला गुन्हेगार मानता की इमानदार? आता मी दोन दिवसात मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देत आहे. मी प्रत्येक घराघरात आणि गल्लीबोळात जाईन, जोपर्यंत जनतेचा निकाल येत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com