Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : दिल्लीनंतर भाजपची 'या' राज्यांकडे वक्रदृष्टी; केजरीवालांचा मोठा आरोप

BJP Vs Delhi Government : सर्वोच्च न्यायालयाने मला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यास नकार दिला. आता राजीनामा दिला तर मला शंभर टक्के अटक केली जाणार, असा धोकाही केजरीवाल यांनी यावेळी बोलून दाखवला.

Sunil Balasaheb Dhumal

BJP Political News : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची ताकद कमी करण्याच्या हेतूने भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. तसेच त्यांनी राजीनामा देण्यासाठी दबावही आणल्याचा आरोप होत होते. जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी तुरुंगात प्रकृतीवर परिणामी होण्यासाठी विविध खेळ खेळले गेल्याचा गंभीर आरोप केला.

आता तर त्यांनी माझ्यानंतर भाजपच्या हिटलिस्टवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamta Banerjee आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन असल्याचा दावा केला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Arvind Kejriwal News

एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल यांनी देशातील लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजप मला दिल्लीत हरवू शकत नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे मी राजीनामा द्यावा अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचीच इच्छा आहे. माझ्यानंतर आता ममता बॅनर्जी, पिनाराई विजयन यांचा नंबर असणार आहे. त्यांना अटक करून पश्चिम बंगाल आणि केरळमधील सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. मी राजीनामा दिल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल. मला पदाचा लोभ नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal तुरुंगात असताना भाजपच्या वतीने त्यांच्या राजीनाम्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका फेटाळण्यात आली आहे. याचा दाखला देत केजरीवाल म्हणाले, मी आयकर आयुक्ताची नोकरी सोडून झोपडपट्टीत काम केले. पण आज मी ही खुर्ची सोडणार नाही. हा माझ्या संघर्षाचा मोठा भाग आहे. भाजपने याचिकाही दिली होती, पण सर्वोच्च न्यायालयाने मला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यास नकार दिला. आता राजीनामा दिला तर मला शंभर टक्के अटक केली जाणार, असा धोकाही केजरीवाल यांनी यावेळी बोलून दाखवला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT