PMC News : मोठी बातमी! आरोग्यमंत्री सावंतांचा 'डोस'; डॉ. भगवान पवारांना पुणे महापालिकेतून 'डिस्चार्ज'

Dr. Bhagwan Pawar : डॉ. पवार हे महापालिकेत येण्यासाठी मोठा व्यवहार झाल्याकडे बोट दाखवले गेले. याच काळात आरोग्य मंत्री सावंतांकडून बळ मिळाल्याने डॉ. पवार जोरात कामाला लागले. मात्र, पुढच्या तीन महिन्यातच सावंत आणि डॉ. पवार यांच्यात खटके उडाल्याचेही सांगण्यात आले. त्यावरून तीन महिन्यातच डॉ. पवारांच्या बदलीचा आदेश आरोग्य खात्याने काढला होता.
Dr. Bhagwan Pawar, Tanaji Sawant
Dr. Bhagwan Pawar, Tanaji SawantSarkarnama

Pune News : ठाकरेंचे सरकार पडल्यानंतर शिंदे सरकार येताच, प्रचंड खटाटोप करून आरोग्यमंत्र्यांची 'मर्जी' सांभाळून पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुखपदाच्या डॉ.भगवान पवार खुर्चीत बसले. पण आता त्यांना शिंदे सरकारनेच निलंबनाचे इंजेक्शन दिले. म्हणजे, या पदावर येण्याआधी डॉ. पवारांनी केलेल्या कारनाम्यांची गंभीरपणे दखल घेऊन त्यांचे निलंबन करत असल्याचे राज्य सरकारच्या आदेश स्पष्ट केले आहे. PMC News

डॉ.भगवान पवार Dr. Bhagwan Pawar यांच्यावर महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण,महिला सहकाऱ्यांना मानसिक देणे,कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.गंभीर म्हणजे,या पदासाठी अधिकाऱ्यांची स्पर्धा असतानाही आरोग्यमंत्र्यांना 'शब्द'देऊन डॉ.पवार हे महापालिकेत आले होते.मात्र,याच डॉ.पवारांना आता थेट आरोग्यमंत्र्यांनीच धडा शिकविल्याने महापालिका आणि सरकारच्या प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झडत आहे.

पुणे महापालिकेत आल्यानंतर पहिल्या तीन-साडेतीन महिन्यांतच डॉ. पवारांची बदली करण्यात आली. त्यानंतर 'मॅट'कडे दाद मागून डॉ. पवारांनी बदलीला स्थगिती मिळवली. त्यामुळे डॉ. पवार हे एका मंत्र्याला आव्हान देऊन पुणे महापालिकेत राहिल्याचे बोलले गेले.डॉ.पवार यांच्या पवित्र्यामुळे संतापलेल्या आरोग्य खात्यातील वरिष्ठांनी त्यांच्या जुन्या कारनाम्यांच्या फाइली उघडल्या आणि त्याच्या चौकशीचा आदेश काढला. त्यासाठी खास समितीही नेमली.

त्यात डॉ. पवार यांनी सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी असताना सहकारी महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार होती. त्याशिवाय, इतर महिलांना मानसिक त्रास दिल्याचीही तक्रार आरोग्य खात्याकडे आली होती. त्यापलीकडे जाऊन आरोग्यखात्यात वेगवेगळ्या भागांत काम करत असताना, कामात प्रामुख्याने आरोग्यखात्यात साहित्य खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता.

Dr. Bhagwan Pawar, Tanaji Sawant
Balasaheb Thorat News : प्रवरा नदीतील घटनेवरून विखे पाटलांना सुनावले; बाळासाहेब थोरात नेमके काय म्हणाले?

या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याच्या हेतुने आरोग्य खात्यातून मोठी यंत्रणा कामाला लागली होती. त्यासाठी दीड वर्षाआधीच भलीमोठी फाइल तयार करून ती तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ.सौरभ राव Saurabh Rao यांच्याकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यानंतर डॉ.भगवान पवार यांनी शिंदे सरकारमध्ये 'सेटिंग' करून आपली चौकशी थांबविण्याचा प्रयत्न केला होता.ते एवढ्यावरच थांबले नाहीतर; तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्यमंत्री तानाजी सावंत Tanaji Sawant यांच्यासोबत जुवळून घेत, महापालिकेतील महत्त्वाचे आरोग्य प्रमुखपद आपल्याकडे खेचून घेतले. त्यासाठी डॉ. पवारांनी मोठी बरेच काही केल्याचेही चर्चा होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पवार हे महापालिकेत येण्यासाठी मोठा व्यवहार झाल्याकडे बोट दाखवले गेले. याच काळात आरोग्य मंत्री सावंतांकडून बळ मिळाल्याने डॉ. पवार जोरात कामाला लागले. मात्र, पुढच्या तीन महिन्यांतच सावंत आणि डॉ. पवार यांच्यात खटके उडाल्याचेही सांगण्यात आले. त्यावरून तीन महिन्यांतच डॉ. पवारांच्या बदलीचा आदेश आरोग्यखात्याने काढला.

Dr. Bhagwan Pawar, Tanaji Sawant
Who Is Dhangekar : चंद्रकांतदादांना दूध पोळले होते; सामंतांनी ताक फुंकून प्यायला हवे होते...

परंतु, मोठी किंमत मोजून हे पद ओढून घेतलेल्या डॉ. पवारांनी बदलीच्या आदेशाला 'चॅलेंज' केले आणि 'मॅट'कडे जाऊन आपली भूमिका मांडली. त्यावरच्या लढाईत डॉ.पवार जिंकले आणि महापालिकेत आरोग्यप्रमुख या पदावर ते पुन्हा बसले. त्यावरच्या लढाई डॉ. पवार जिंकले आणि महापालिकेत आरोग्य प्रमुख या पदावर राहण्याच्या आदेश 'मॅट'ने दिला. हा आदेश मिळवून डॉ. पवार पुन्हा महापालिकेतच राहिल्याने राज्याच्या आरोग्य खात्यातील काही वरिष्ठांचे पित्त खवळले. त्यातून डॉ. पवारांच्या जुन्या फाइलींवरची धूळ झटकली गेली आणि अखेर पवार यांना निलंबनाचा डोस दिला गेला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com