Asaduddin Owaisi On Pahalgam Attack : कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारला त्यानंतर गोळ्या मारून पर्यटकांची हत्या केली, असे सांगितले जात आहे. या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा देखील अटोपता घेत ते आज (बुधवारी) सकाळी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले. सुरक्षा यंत्रणांच्याबाबतीत ते आज महत्त्वाची बैठक घेणर आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवैसींकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांनी या हल्ल्यातील मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. ओवैसी म्हणाले, "हा हल्ला अमानवी आहे आणि अशा हिंसक कृतींचं कोणत्याही स्वरूपात समर्थन करता येणार नाही. पीडित कुटुंबांसोबत मी आणि माझा पक्ष ठामपणे उभा आहे."
दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरमध्ये दाखल झाले. आज (बुधवार) ते पहलागामध्ये जाणार आहेत. तेथे ते सुरक्षासंदर्भात आढावा घेतली तसेच घटनास्थळा देखील भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्यासोबत फोनद्वारे सौदी अरेबियातून संवाद साधला होता. त्यानतंर शहा हे तातडीने काश्मीरला रवाना झाले.
दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करणारे ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकार कठोर कारवाई करेल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.