Narendra Modi On Pahalgam Attack: 'पहलगाम'चा वार भारताच्या जिव्हारी; PM मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपला; मोठा निर्णय होणार..?

Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.
PM Narendra modi Pahalgaam Terror Attack .jpg
PM Narendra modi Pahalgaam Terror Attack .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी (ता.22) भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. यावेळी धर्म विचारत दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांनाच लक्ष्य केलं आहे. यावेळी त्यांनी 40 ते 50 फायर करण्यात आल्याची माहिती आहे. आता याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी(ता.23) पहाटे पाचच्या दरम्यान भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे( Pahalgam Terriost Attack) मोदींनी नियोजित वेळेपूर्वीच यूएईचा दौरा आटोपता घेतला आहे. त्यामुळे रात्री बुधवारी(ता.22) मध्यरात्रीच पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.

सौदी अरेबियाच्या सरकारने आयोजित केलेल्या डिनरलाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. बुधवारी पहाटे नरेंद्र मोदी पाच वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कॅबिनेट सुरक्षा समिती आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबतही मोदी सुरक्षेची आढावा घेणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

PM Narendra modi Pahalgaam Terror Attack .jpg
Pahalgam Terroist Attack Pakistan Connection: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागं 'पाकिस्तान कनेक्शन'? लष्करप्रमुखांचं हिंदू विरोधातील चिथावणीखोर भाषण...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. यानंतर शाह यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतल्याची मोठी माहिती समोर आला आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. हा हल्ला पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यांवर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी घडवून आणला.

PM Narendra modi Pahalgaam Terror Attack .jpg
Karuna Munde Vs Walmik Karad : वाल्मिक कराडला जेलमध्ये भेटायला जाणार; करुणा मुंडेंच्या दाव्यानं खळबळ

कोणालाही सोडणार नाही...!

पंतप्रधान मोदींनी या दहशतवादी हल्ल्यावच्या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक इशाराही दिला आहे.'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात,जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध नोंदवतो.ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले,त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत.जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करत असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

तसेच पीडित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार दृढ आहे आणि तो आणखी मजबूत होईल अशी ग्वाहीही मोदींनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com