Asaram Bapu Sarkarnama
देश

Asaram Bapu : बलात्कारी आसाराम बापूची शाही बडदास्त? का आणले पुण्यात?

Asaram Bapu Rape Case : अकरा वर्षांनी तुरुंगाबाहेर पडलेला आसाराम बापूची खोपोलीत खाजगी कॉटेजमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune : बलात्काराची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला जोधपूर मधून पुण्यात आणण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर आता आसाराम बापू पुण्यामध्ये पोहोचला आहे. आसाराम बापू तब्बल 11 वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे.

जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये आसाराम बापूला इंदूरमधील एका आश्रमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. पाच वर्षे चाललेल्या खटल्यानंतर 2018 मध्ये आसाराम बापूला जन्मठेशी ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

गुजरात मधील गांधीनगर येथील आश्रमातील आणखी एका महिलेने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. या केसचा निकाल 2023 मध्ये गांधीनगर कोर्टाने दिला. त्यामध्ये देखील त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तब्बल अकरा वर्ष आसाराम बापू तुरुंगात आहे. आता शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राज्यस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसाराम बापूला सात दिवसांचा पॅरोल कोर्टाने मंजूर केला आहे.

काही दिवसांपासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास सुरू आहे. यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. यासाठी आसाराम बापूला जोधपूर मधून पुण्यात आणण्यात आले आले. तिथून खोपोली येथील एका खासगी कॉटेजमध्ये हलवण्यात आले असून उपचारही सुरू करण्यात आले आहेत.

चोवीस तास पोलिस बंदोबस्तात बापूवर उपचार करण्यात येणार असून या उपचाराचा आणि प्रवासाचा सर्व खर्च आसारामला करायचा आहे. आसारामला उपचारासाठी पुण्यात आणल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पुणे पोलिसांकडून कोर्टाला सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतरही आसारामला पुण्यात उपचार घेण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

परवानगी देताना काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. यामध्ये त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवासात सोबत असतील, तसेच आसारामला उपचारादरम्यान सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली आहे. उपचारादरम्यान त्याला एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून त्या ठिकाणीच त्याचा उपचार करण्यात येणार आहे. या उपचारासाठी व वाहतुकीसाठी आणि पोलीस बंदोबस्त साठी येणारा संपूर्ण खर्च आसारामला करावा लागणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT