Shahaji Kakade : निंबुतमधील 'त्या' गोळीबार प्रकरणात शहाजी काकडेंना अखेर जामीन मंजूर!

Nimbut firing Case News : बारामती येथील निंबुत येथील आहे प्रकरण अन् सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत शहाजी काकडे.
Shahaji Kakade
Shahaji KakadeSarkarnama
Published on
Updated on

Shahaji Kakad finally granted bail : सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. शर्यतीच्या बैलाच्या वादावरून बारामती तालुक्यातील निंबुत येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी त्यांना अटक झाली होती. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात काकडे पिता-पुत्र व अन्य तीन अशा एकूण सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहाजी काकडे(Shahaji Kakade) यांचे ज्येष्ठ पुत्र गौतम काकडे यांनी 5 लाख इसार देऊन फलटण येथील बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांचा 'सुंदर' नावाचा बैल घेतला होता. या व्यवहारातील उरलेली रक्कम नेण्यासाठी गुरुवारी 27 जून रोजी रात्री 11 वाजता निंबाळकर हे पत्नी अंकिता व अन्य सहकाऱ्यांसह काकडे यांच्या निवासस्थानी निंबुत येथे आले होते.

याप्रसंगी झालेल्या वादावादीनंतर निंबाळकर यांच्यावर गौतमचे बंधू गौरव याने गोळी झाडली. शनिवारी 29 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शिवाय या प्रकरणाने बैलगाडा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती.

Shahaji Kakade
Gautam Kakade: बारामतीतील निंबाळकर खून प्रकरणी फरार आरोपी गौतम काकडे याला अटक

वास्तविक शहाजी काकडे यांचे अंकिता निंबाळकर यांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते. मात्र गोळीबारातील पिस्तुल परवाना त्यांच्या नावे होता, तसेच पुरावे नष्ट करण्याचा आरोपही त्यांच्यावर पोलिसांनी ठेवला होता. याप्रकरणी बारामती न्यायालयाने काकडे पिता-पुत्रांसह सर्व सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

शहाजी काकडे यांचा मांडलेला जामीनही बारामती(Baramti) जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडल्यावर उच्च न्यायालयाने मंगळवारी जमीन मंजूर केला. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. हर्षद निंबाळकर व अ‍ॅड. धैर्यशील जगताप यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. पंकज देवकर यांनी बाजू मांडली.

Shahaji Kakade
Baramati Crime News : बैलावरून राडा, काकडेंकडून गोळीबार; उपचारादरम्यान रणजित निंबाळकरांचा मृत्यू

अ‍ॅड. धैर्यशील जगताप म्हणाले, एफआयआरमध्ये काकडे यांचे नाव नव्हते तसेच प्रत्यक्ष घटनेत कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. फक्त हत्यार परवाना नावे आहे, अशी बाजू मांडल्याने उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला अशी माहिती दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com