Ashok Chavan  Sarkarnama
देश

Ashok Chavan Resigns : विश्वासघातकी..! चव्हाणांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या बड्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया...

Rajanand More

New Delhi : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. त्यांच्यासोबत पंधराहून अधिक आमदार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली असली तरी राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने मात्र हल्लाबोल केला आहे. चव्हाण यांचे नाव न घेता पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांना त्यांनी विश्वासघातकी म्हटले आहे. (Ashok Chavan Resigns)

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी पक्ष सोडला. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर बडे नेते पक्षाला सोडून जात असल्याने पक्षामध्ये खळबळ उडाली आहे.

यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विटरवरून चव्हाणांसह पक्ष सोडणाऱ्या नेत्यांचा उल्लेख विश्वासघातकी असा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नेत्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त देऊनही मित्र, सहकारी राजकीय पक्ष सोडतात, तेव्हा थोडी निराशा होते; पण असुरक्षेच्या भावनेने घेरलेल्या अशा लोकांसाठी विशेष वॉशिंग मशिन वैचारिक किंवा व्यक्तिगत निष्ठेपेक्षा अधिक आकर्षक असल्याचे सिद्ध होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विश्वासघात करणाऱ्या या लोकांना याची जाणीव नाही की, त्यांच्या जाण्यामुळे अशा लोकांचाच अधिक फायदा होणार आहे, त्यांचा ते सातत्याने विरोध करत होते, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. मिलिंद देवरांनी पक्ष सोडल्यानंतरही जयराम रमेश यांनी अशाचप्रकारे थेट निशाणा साधला होता.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याबाबत मीडियाशी बोलताना पक्षातील कोणत्याही नेत्यावर किंवा पक्षावर बोलणे टाळले. मला पक्षाने खूप काही दिले आहे, त्याचप्रमाणे मीही पक्षासाठी खूप केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आता नवीन पर्याय शोधत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपण पक्षातील एकाही आमदाराशी संपर्क साधला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT