Congress leadership news : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या विषयाला तोंड फोडले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी त्यांना होती. पण एका षडयंत्रामुळे गेल्याचे सांगत गेहलोत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गेहलोत यांच्या या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. जयपूरमध्ये मीडियाशी बोलताना गेहलोत यांनी काही वर्षांपूर्वीचा मुद्दा उकरून काढला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना सोनिया गांधी आणि इतर बड्या नेत्यांनी अशोक गेहलोत यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले होते. पण नंतर त्यांचे नाव मागे पडले. त्यावेळी ते राजस्थानचे मुख्यमंत्री होते.
यावर आज बोलताना गेहलोत म्हणाले, मला अध्यक्ष व्हायचे होते. माझी तयारी होती. सोनिया गांधींनी विचारले असते तर मी नाही म्हणालो असतो का? पण त्यावेळी षडयंत्र झाले. अचानक पक्ष निरीक्षक आहे. तमाशा झाला. त्यानंतर संपूर्ण देशात माझ्याविषयी चुकीची प्रतिमा तयार झाली.
अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिच राहायचे होते, त्यामुळे त्यांनी अध्यक्षपद नाकारले. या गोष्टीमुळे राज्यात बंड झाल्याचे सर्वजण मानतात. पण मी त्यावेळी गप्प बसलो. काहीच बोललो नाही. मी विधिमंडळ पक्षाचा नेता होतो. त्यानंतर मी सोनिया गांधी यांची माफीही मागितली, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले आहे. या घडामोडींमागची सत्ता खूप कमी लोकांना माहिती आहे. मी समजावण्याचा प्रयत्न करतो. पण लोकांची धारणा बनली असून ती दूर करणे सोपे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मी अशिक्षित नेता नसल्याचे सांगत गेलहोत म्हणाले, कामराज, महात्मा गांधी, नेहरू आणि सरदार पटेलही काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे अध्यक्षपद हे नेहमीच सन्मानाची बाब आहे. अध्यक्ष बनण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कुटुंबाची किंवा पार्श्वभूमीची गरज नसते, असेही गेहलोत म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.