India Alliance news : इंडिया आघाडी फुटली म्हणणाऱ्या भाजपचा मोठा भ्रमनिरास; बड्या नेत्याने मित्रपक्षांचा आकडा सांगत दिली बैठकीची अपडेट...

INDIA bloc meeting, opposition alliance : महागाईद्वारे घरगुती बजेट बिघडविले आहे. सरकारकडून लाखो युवकांच्या अपेक्षांचा विश्वासघात केला जात आहे, त्याविरोधात सर्व पक्ष एकजुटीने उभे असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
India Alliance
India AllianceSarkarnama
Published on
Updated on

BJP vs INDIA bloc : तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने टीव्हीकेला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने द्रमुक काँग्रेससोबतची आघाडी तोडली. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केरळमधील निवडणुकीतील आरोपांवर काँग्रेसकडून खुलासा मागविला आहे. आम आदमी पक्षानेही काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इंडिया आघाडी फुटल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

इंडिया आघाडीची बैठक ८ जूनला दुपारी १२ वाजता नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे होणार आहे. या बैठकीआधीच आघाडीतील मित्रपक्षांनी उघडपणे काँग्रेसविरोधातील आपली नाराजी व्यक्त केली आहे. डीएमकेने बैठकीला हजर राहण्याचे आधीच जाहीर केले आहे. आघाडीत सुरू असलेली ही सुंदोपसुंदी पाहून भाजप नेत्यांनी इंडिया आघाडी फुटल्याची टीका सुरू केली होती. बहुतेक पक्षांनी काँग्रेसशी काडीमोड घेतल्याचा दावा करण्यात आला.

आघाडीच्या बैठकीआधी सुरू असलेल्या या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बैठकीला उपस्थित राहणाऱ्या मित्रपक्षांचा आकडाच सांगितला आहे. सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे २३ राजकीय पक्षांनी स्पष्ट केले आहे. काही पक्षांनी काही कारणांमुळे बैठकीला हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.

India Alliance
Court verdict news : तब्बल 10 वर्षांनी आमदारकी रद्द केली, हायकोर्टाने सुप्रीम कोर्टालाच धरलं जबाबदार; नेमकं काय घडलं?

बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या पक्षांनी मोदी सरकारची धोरणे आणि कारवाईचा कठोरपणे विरोध केला आहे. जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, लाखो भारतीयांचा मतदानाचा अधिकार मोदी सरकारकडून काढून घेतला जात आहे. संविधानावर रोज हल्ला होत आहे. तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. कोट्यवधी भारतीयांच्या रोजच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे.

India Alliance
Top 10 News : काँग्रेसचा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला, राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी पेचात, शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा... वाचा महत्वाच्या घडामोडी

महागाईद्वारे घरगुती बजेट बिघडविले आहे. सरकारकडून लाखो युवकांच्या अपेक्षांचा विश्वासघात केला जात आहे. विदेश धोरणांच्या माध्यमातून राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड केली जात असल्याचा राजकीय पक्षांकडून विरोध केला जात असल्याचे जयराम रमेश यांनी सांगितले. भारताप्रमाणेच इंडिया जनबंधन आपल्या विविधतेसह एकजूटीने उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com