Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama
देश

India vs Pakistan Cricket : ट्रम्प यांची धमकी की भाजप सदस्यांची पैशांची उलाढाल? थेट PM मोदींना पत्र लिहित संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut On Asia Cup India Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेत भारताच्या टीमला पाकिस्तानसोबत खेळण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचा आता सर्वच स्थरातून कडाडून विरोध केला जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाऊ नये अशी अनेकांची मागणी आहे.

Jagdish Patil

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेत भारताच्या टीमला पाकिस्तानसोबत खेळण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाचा आता सर्वच स्थरातून कडाडून विरोध केला जात आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाऊ नये अशी अनेकांची मागणी आहे.

अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध दर्शवला आहे. शिवाय पाकिस्तानसोबतचा सामना म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान असल्याचंही राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने खेळवण्यासाठी मंजूरी दिल्याच्या बातम्या वेदनादायी असून गृह आणि पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. तुम्ही म्हणता पाकिस्तानविरुद्धचे ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही.

जर संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? असा सवाल करत राऊतांनी मोदींना जाब विचारला आहे. तर, पहलगाम येथील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला ज्यामध्ये 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का?

आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का? असा टोलाही राऊतांनी पत्रातून लगावला आहे. तसंच तुम्ही सांगितलं होतं की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मग आता, रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू लागतील का?

असा सवाल करत त्यांनी या सामन्यांमागे भाजपचं काही पैशांचं कनेक्शन आहे का अशी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी पत्रात लिहिलं की, 'पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगार खेळला जातो. ज्यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गुजरातमधील जय शाह सध्या क्रिकेटचा व्यवहार सांभाळत आहेत. यामध्ये भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का?'

शिवाय हे सामने दुबईत होत आहेत. मात्र, जर ते महाराष्ट्रात झाले असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने ते होऊ दिले नसते. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा पाकिस्तानसोबत क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशातील लोकांच्या भावनांना निरर्थक समजत आहात, अशा शब्दात त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT