Congress MLA joins BJP Sarkarnama
देश

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या दोघांसह चार आमदार भाजपमध्ये

Rajanand More

Arunachal Pradesh News : देशभरात काँग्रेसला सातत्याने धक्के बसत असून आता बातमी अरूणाचल प्रदेशातून आहे. सत्ताधारी भाजपने काँग्रेसला धक्का दिला आहे. भाजपमध्ये राज्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांसह चौघांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे केवळ दोनच आमदार उरले असून भाजपकडील आमदारांचे संख्याबळ 56 वर पोहचले आहे. (Assembly Election 2024)

अरूणाचलमध्ये (Arunachal Pradesh) 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) 60 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मागील पाच वर्षांत हे संख्याबळ 56 वर पोहचली आहे. विधानसभा निवडणुकीआधीच राज्यातील काँग्रेसचा सुफडा साफ झाला आहे. आज भाजपमध्ये काँग्रेसच्या (Congress) दोन तर राष्ट्रीय लोकदलाच्या दोन आमदारांनी प्रवेश केला.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेस आमदार निनाँग एरिंग आणि वांगलिन लोवंडोंग यांच्यासह मुत्छू मिथी आणि गौकर बसर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आता काँग्रेसकडे दोन आणि अपक्ष दोन असे चारच आमदार विरोधी बाजूला उरले आहेत. राज्यात याचवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी भाजपने विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. त्याचे पडसाद दोन्ही निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मध्य प्रदेशातही काँग्रेसला धक्का

मध्य प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा नूरी खान यांनीही सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मागील 25 वर्षांपासून त्या पक्षामध्य सक्रीय होत्या. विद्यार्थी काँग्रेसमध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. उज्जैन एनएसयूआयच्या अध्यक्षही होत्या. तसेच प्रदेश काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT