Jagan Mohan Vs YS Sharmila : बहिणीचा मुख्यमंत्र्यांना धक्का; जगनमोहन यांना सोडचिठ्ठी देत खासदार रिसेप्शनला...  

Raghu Ramkrishna Raju News : रघू रामकृष्ण राजू यांनी वायएसआल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने जगनमोहन यांना मोठा धक्का बसला आहे. यआधाही तीन खासदारांनी पक्ष सोडला आहे.
Reception of YS Sharmila Reddy's son YS Raja Reddy
Reception of YS Sharmila Reddy's son YS Raja ReddySarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आंध्र प्रदेशमध्येही राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना शनिवारी मोठा धक्का बसला आहे. नसरापूरम मतदारसंघाचे खासदार के. रघू रामकृष्ण राजू यांनी वाय. एस. आर. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (Jagan Mohan Vs YS Sharmila)

जगनमोहन (CM Jagan Mohan Reddy) यांची बहीण वाय. एस. शर्मिला रेड्डी या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. शर्मिला यांच्याकडूनच जगनमोहन यांना धक्का देण्यात आल्याची चर्चा आहे. खासदार के. रघू रामकृष्ण राजू यांनी वायएसआर काँग्रेसला (YSR Congress) रामराम ठोकल्यानंतर काही तासांतच ते थेट शर्मिला (YS Sharmila Reddy) यांच्या मुलाच्या विवाहाच्या रिसेप्शनमध्ये अवतरले. शनिवारी हे रिसेप्शन झाले.

Reception of YS Sharmila Reddy's son YS Raja Reddy
Lok Sabha Election 2024 : अहमद पटेलांच्या मुलीने मागितली कार्यकर्त्यांची माफी; भाजपनं काँग्रेसला डिवचलं...

शर्मिला यांनी लोकसभा निवडणुकीआधी (Lok Sabha Election) आपल्या भावाविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे राजू यांच्या राजीनाम्यामागेही त्यांचाच हात असल्याची चर्चा आहे त्यातच ते रिसेप्शनलाही हजर झाल्याने या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, राजू यांनी पक्ष सोडताना जगनमोहन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदारकी रद्द करण्याचा जगनमोहन यांनी अनेक प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. त्यांच्याकडून मला अनेकदा शारीरिक इजा पोहचवण्याचा प्रयत्न करूनही मी मागील साडेतीन वर्षे मतदारसंघात विकासाचे काम करत राहिलो. लोकसेवेसाठी मी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Reception of YS Sharmila Reddy's son YS Raja Reddy
Mann Ki Baat News : ‘मन की बात’ला मोठा ब्रेक; पंतप्रधान मोदींनीच केली घोषणा...

तीन दिवसांपूर्वीच वायएसआरचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रभाकर रेड्डी वेमीरेड्डी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारण दिले आहे. त्यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांना वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून तिकीटही जाहीर करण्यात आले होते. यापूर्वी लोकसभेच्या तीन खासदारांनी राजीनामा दिला आहे.

Reception of YS Sharmila Reddy's son YS Raja Reddy
Lok Sabha Election 2024 : खासदाराच्या भाजप प्रवेशानंतर बसपामध्ये होणार विस्फोट? मायावती थेट तिकीटावरच बोलल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com