Hemant Soren Sarkarnama
देश

Assembly Election : प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री अडचणीत? खासगी सचिवांच्या घरी IT विभागाची रेड

Hemant Soren Personal Secretary Sunil Srivastava : झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी विरुध्द एनडीए अशी थेट लढत होत आहे.

Rajanand More

ljJharkhand Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच मुख्य़मंत्री हेमंत सोरेन यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव अडचणीत आले असून त्यांच्या घरासह इतर ठिकाणी प्राप्तीकर विभागाने शनिवारी सकाळी छापेमारी केली आहे.

सुनील श्रीवास्तव यांच्या रांची येथील सात आणि जमेशेदपूर येथील नऊ ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. ऐन निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत ही छापेमारी झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. हवालाच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते.

सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून श्रीवास्तव सध्या सक्रीय आहेत. त्यामुळे या छापेमारीकडे राजकीय हेतून पाहिले जात आहे. याआधी 14 ऑक्टोबरला सोरेन यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या भावाच्या घरी ईडीने धाड टाकली होती. तसेच त्यांचे खासगी सचिव हरेंद्र सिंह आणि विभागातील काही अभियंत्याच्या घरीही छापेमारी झाली होती.

दरम्यान, झारखंडमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 13 नोव्हेबंरला असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आता केवळ तीन दिवस उरले आहेत.

राज्यात इंडिया आघाडी विरुध्द एनडीए असा थेट सामना होत आहे. लोकसभा निवडणुकीआधी सोरेन यांना ईडीने अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच ते जामीनावर बाहेर आले आणि पुन्हा मुख्यमंत्री बनले. या राजकीय घडामोडींमुळे सोरेन यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या नेत्यांच्या मागे लागला आहे.

भाजपने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. तर इंडिया आघाडीकडूनही सोरेन यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे प्रचारात उतरले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT