Assembly Elections sarkarnama
देश

Assembly Elections : विधानसभेच्या 40 जागा, पण या राज्यात एकही महिला आमदार नाही

Sachin Fulpagare

Mizoram Election 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडतोय. या पाच राज्यांसाठी ७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदान होणार आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मतदान होत आहे. छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबरला आणि तेलंगणमध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान झालं. या पाचही राज्यांचे निकाल हे ३ डिसेंबरला लागणार आहेत.

एकही महिला आमदार नाही?

४० जागा असलेल्या मिझोराम विधानसभेत यंदा ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. पण मिझोरामची मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे ४० आमदारांमध्ये एकही महिला नाहीये. मिझोराममधील ३९ पैकी ३५ आमदारांची संपत्ती ही १ कोटीहून अधिक आहे, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर )ने आपल्या अहवालात दिली आहे. ( Political News India )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वात श्रीमंत आमदार रॉबर्ट रोमाविया रॉयटे

मिझोराममधील ४० पैकी एका आमदारावर गुन्हे दाखल आहेत. ( Assembly Election Rajasthan ) तर मिझो नॅशनल फ्रंटच्या दोन आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. मिझोराममधील ४० पैकी ३५ आमदार करोडपती आहेत. यात MNF Aizawl चे रॉबर्ट रोमाविया रॉयटे हे सर्वाधिक श्रीमंत आमदार आहेत. त्यांची संपत्ती ४४.७४ कोटी रुपये आहे. त्यानंतर MNFचे आमदार रामथनमाविया यांचं नंबर लागतो. त्यांची संपत्ती १६.९८ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती एडीआरने दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT