PM Modi's Security Breached : मोदींच्या कारसमोर अचानक महिलेची उडी, सुरक्षेतील मोठी चूक उघड

PM Modi's Security Breached In Ranchi: झारखंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे...
PM Modi's Convoy
PM Modi's ConvoySarkarnama
Published on
Updated on

PM Modi in Jharkhand : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर होते. या वेळी रांचीमध्ये त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. पंतप्रधान मोदींच्या कारसमोर अचानक एक महिला आल्याने काहीसा गोंधळ उडाला होता.

PM Modi's Convoy
Rahul Gandhi News : ''मी सगळा हिशेब ठेवतोय... ; राहुल गांधींचा PM मोदींना इशारा

पंतप्रधान मोदी हे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमावरून परतत होते. या वेळी एक महिला अचानक पंतप्रधान मोदींच्या कार समोर आली. हे पाहताच सुरक्षेवर तैनात सुरक्षारक्षकांनी त्या महिलेला तातडीने बाजूला केलं.

महिला अचानक पंतप्रधान मोदींच्या कार समोर आल्याने काही सेकंद कार तिथेच उभी होती. पण सुरक्षारक्षकांनी महिलेला लगेचच तिथून हटवल्याने मार्ग मोकळा झाला. आणि पंतप्रधान मोदींचा ताफा पुढे रवाना झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशातील प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मंगळवारी झारखंडमध्ये आले होते. त्यानंतर आदिवासी नेता बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ते सहभागी झाले. त्यांनी रांचीमध्ये बिरसा मुंडा मेमोरियल पार्क आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या संग्रहालयाला भेट दिली. या वेळी पंतप्रधान मोदींनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींसोबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री आदिवासी विकासमंत्री अर्जुन मुंडा आणि झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते.

PM Modi's Convoy
Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये बस अपघातात 36 जणांचा मृत्यू; मोदींनी केली मदतीची घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com