Narottam Mishra, Faggan Singh Kulaste Sarkarnama
देश

Assembly Elections Results 2023 : मध्य प्रदेशात केंद्रीय मंत्र्यांची हार; गृहमंत्रीही पराभवाच्या छायेत

सरकारनामा ब्यूरो

Election Results 2023 : मध्य प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. ही निवडणूक भाजपला जड जाईल, असे सुरूवातीला सांगितले जात होते. त्यामुळे पक्षाने केंद्रीय मंत्र्यांसह खासदार व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत काँग्रेसचा सुफडा साफ झाला. मात्र, असे असताना एका केंद्रीय मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पक्षाचे मातब्बर नेते व सध्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्राही मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत.

भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते, खासदार राकेश सिंह, खासदार रीती पाठक, खासदार राव उदय प्रताप सिंह, भाजपचे राष्ट्रीय नेते कैलास विजयवर्गीय यांना रिंगणात उतरले होते. त्यामुळे या नेत्यांच्या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यापैकी कुलस्ते यांना वगळता इतर नेत्यांनी आपल्या मतदरासंघात आघाडी घेतली आहे. (Five States Assembly Election Results 2023)

कुलस्ते यांना पराभव पत्करावा लागला आहे. ते ३३ वर्षांनी विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. मंडला जिल्ह्यातील निवास या मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळाले होते. पण सहावेळा लोकसभा खासदार आणि एकदा राज्यसभेवर गेलेल्या कुलस्ते यांना विधानसभेची निवडणूक जिंकता आली नाही. विशेष म्हणजे सध्या ते याच मतदारसंघाचा समावेश असलेल्या मंडला या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवास मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चैनसिंग वरकडे यांनी कुलस्ते यांचा पराभव केला आहे. वरकडे यांना ९९ हजार ६४४ मते मिळाली असून कुलस्ते यांचा ९ हजार ७२३ मतांनी पराभव झाला आहे. त्याचप्रमाणेच राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा सध्या पिछाडीवर आहेत. ते भाजपचे मात्तबर नेते मानले जातात. पक्षाची भूमिका अधिक आक्रमकपणे मांडणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण दतिया मतदारसंघात काँग्रेसच्या भारती राजेंद्र आघाडीवर आहे. दोघांमध्ये सहा हजारांहून अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Rajanand More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT