Rajasthan Assembly Election 2023 Result in Marathi : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत असलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप मुसंडी मारत सत्तेच्या जवळ गेल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेसला छत्तीसगडमधील सत्ता रोखण्यात भाजप अपयशी ठरल्याचे दिसत आहे. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये भाजपला आपले यश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम असल्याचे या कौलांवरून स्पष्ट दिसत आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत हाती आलेल्या कलांच्या आकडेवारीनुसार भाजप 157 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस केवळ 72 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये 106 जागांवर भाजप आघाडीवर, काँग्रेस 77 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर आहेत, तर मध्य प्रदेशात छिंदवाडा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात झालरापाटन या मतदारसंघातून भाजपच्या वसुंधरा राजे शिंदे आघाडीवर आहेत. भाजपने त्यांना साइडलाइन केले अशी चर्चा होती. आता त्यांनी सुरुवातीच्या कळात आघाडी घेतली आहे. या दोन्ही मोठ्या राज्यांमध्ये भाजपने घेतलेली आघाडी ही पक्षासाठी मोठी गोष्ट आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी दोन टप्प्यांत मतदान पार पडले होते. छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या द्वंदयुद्धाचा आज फैसला होणार आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र, भाजप हा काँग्रेसची आकड्यांमध्ये पाठ सोडताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची मोठी मजल मारताना दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे.
छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 7 आणि 17 नोव्हेंबर असे दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, जनता काँग्रेस छत्तीसगड (जेसीसी) आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) हे चार प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच पाहायला मिळत आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर काही खासगी संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामध्ये जनमताचा कौल हा काँग्रेसच्या बाजूने दर्शवण्यात आला आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. असे असले तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र आज मतमोजणीपूर्वीच भूपेश बघेल यांच्या सरकारला जनता कंटाळली आहे. जनमताचा कौल आम्हालाच मिळेल, असा दावा केला जात आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अखेरच्या सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गुडबाय केसीआर असे सांगत सत्ता येण्याचे जणूकाही निश्चितच सांगितले होते. रेवंथ रेड्डी यांना चेहरा बनवून काँग्रेसने या ठिकाणी बीआरएस पक्षाला चांगलेच आव्हान दिले होते. काँग्रेसने या ठिकाणी सुरुवातीच्या कलानुसार 69 जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे, तर बीआरएसला 38 जागांवर रोखले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.