Acharya Pramod Krishnam News : यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण असतात, तर अपयश हे अनाथ असते, या उक्तीनुसार कॉंग्रेसच्या पराभवानंतर पक्षातील नेते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. कॉंग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, कॉंग्रेसमधील काहींना राम नाम, सनातन नको आहे म्हणूनच कॉंग्रेसचा सर्वत्र पराभव होत आहे. त्यांच्या या वक्तव्याने कॉंग्रेसच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ होऊ शकते. (Assembly Elections Results 2023 : Congress leader Acharya Pramod Krishnam's reaction to defeat in three states)
कृष्णम यांनी सांगितले की, मी नेहमीच सांगत होतो, भारतीय जनता पक्षाशी लढावे. मात्र, भगवान श्रीराम यांचा विरोध नको. कॉंग्रेसची वाटचाल ही महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू होती. मात्र, काहींनी पक्षाला मार्क्सकडे नेण्याचा प्रयत्न केला. जे कोणी सनातन मिटवण्याची भाषा करतात. कॉंग्रेस त्यांच्यासोबत आहे. हा मार्ग महात्मा गांधींचा नाही.
भगवान श्रीरामांचा विरोध नको
महात्मा गांधी हे खरे सेक्युलर होते. सनातनला विरोध करून देशात राजकारण होऊ शकत नाही. कॉंग्रेसमध्ये असे काही नेते आहेत, त्यांना असे वाटते की, भगवान श्रीराम यांचे नाव घेतले जाऊ नये. सनातनबद्दल काहीही बोलले जाऊ नये. यामुळेच मला पक्षाने प्रचारक केले नाही. याउलट जे सनातनला शिव्या देतात, त्यांना कॉंग्रेसमध्ये मोठे पद दिले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचा विरोध करा, पंतप्रधानांचा नको
पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, ते सर्व देशाचे असतात. त्यांचा अपमान नको. पंतप्रधान कोणीही असो, देशाच्या पंतप्रधानांचा अपमान जनता सहन करत नाही. मात्र, कॉंग्रेसमध्ये असे काही नेते आहेत, जे हिंदुत्वामुळे चिडतात आणि त्यामुळेच जातीयवादी राजकारण करतात, असा आरोपही कृष्णम यांनी केला
संजय निरुपम यांनीही केला होता प्रयोग
कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबईचे अध्यक्ष असताना पहिल्यांदाच साधू संत प्रकोष्ठ निर्माण करून हिंदूधर्म व सनातनविषयी श्रद्धा असणाऱ्या मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या वक्तव्याने कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत गोटात खळबळ उडू शकते.
कॉंग्रेसच्या अंतर्गत कार्यपद्धतीवर असा आरोप भाजपकडून नेहमीच केला जातो. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अतिशय खालच्या शब्दांत टीका केली जाते. नुकतेच एका प्रचार सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून पनौती हा शब्द वापरला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.