Assembly Elections Results 2023 : स्मृती इराणी म्हणतात, ‘एक अकेला सब पर भारी!’

Smriti Irani News : भारतीय जनता पक्षाने (भाजप) जवळपास तीन राज्यांमध्ये बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.
Smriti Irani-Narendra Modi
Smriti Irani-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) जवळपास तीन राज्यांमध्ये बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘एक्स’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ ट्विट करत ‘एक अकेला सब पर भारी’ असे म्हटले आहे.

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत असलेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाल्यापासून भाजप आघाडीवर आहे. फेऱ्या जसजशा पुढे जात आहेत, तसतसं भाजप आघाडीवर असलेल्या जागा वाढताना दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Smriti Irani-Narendra Modi
Rajasthan Assembly Results 2023 : मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, भाजप जिंकेल!

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्तेच्या जवळ गेल्याचे स्पष्ट आहे. छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसची सत्ता जवळजवळ उलटवून लावल्याचे दिसत आहे. तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला सत्ता मिळतानाचे चित्र आहे. तीन राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसला लक्ष्य करत भाजप नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मोदींचा लोकसभेतील भाजपचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी म्हणत आहेत की, देश देख रहा है, एक अकेला कितनोंको भारी पड रहा है. यावरून इराणी यांनी मोदींचा चेहराच यापुढे भाजपचा चेहरा असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदींच्या करिष्म्यावरच भाजपने मोठे बहुमत मिळविल्याचे दिसत आहे.

Smriti Irani-Narendra Modi
Chhattisgarh Assembly Election 2023 Result : छत्तीसगडच्या जनतेला भावली मोदींची गॅरंटी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com