Rahul Narwekar and Solicitor General Tushar Mehta  Sarkarnama
देश

Rahul Narwekar Delhi Visit : सुप्रीम कोर्टाने कान उपटल्यानंतर धडकी भरलेल्या राहुल नार्वेकरांनी घेतली महाधिवक्ता तुषार मेहतांची भेट

MLA Disqualification Case: राहुल नार्वेकरांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर चर्चा केल्याची माहिती

Ganesh Thombare

Delhi News : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कान उपटल्यानंतर आता नार्वेकर अॅक्शन मोडवर आले आहेत. या पार्श्वभूमीवरच नार्वेकर हे गुरुवारी सकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. नार्वेकर अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

दिल्लीत जाऊन राहुल नार्वेकर यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेत शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणाच्या निकालासंदर्भात चर्चा केल्यानंतर आता नार्वेकर पुढे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच या प्रकरणाची एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि दोन आठवड्यानंतर काय कार्यवाही केली याबद्दल माहिती द्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना दिले होते. त्यानंतर नार्वेकरांच्या हालचालींना जोरदार वेग आला आहे.

राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाल्यानंतर ते दिल्लीला नेमकं कोणत्या कारणासाठी गेले, याचे स्पष्टीकरण संजय शिरसाटांनी दिले होते. "आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणे महत्वाचे असून तसेच सर्वोच्च न्यायालयाने नेमकी आदेशात काय म्हटलं आहे, यासंदर्भाने माहिती समजून घेण्यासाठी नार्वेकर दिल्लीला गेले आहेत, असे ते म्हणाले होते.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT