Atique Ahmed Murder Case
Atique Ahmed Murder Case  Sarkarnama
देश

Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

सरकारनामा ब्यूरो

लखनऊ : अतिक आणि अशरफ अहमद खून (murder) प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शूटर्सला पिस्तूल पुरविणाऱ्या सोधीचा मृत्यू झाला आहे. हे पिस्तूल शूटर्संना मेरठमधून मिळाले होते. या शूटर्संना शस्त्रे मिळवून देण्यात सोधी याची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. (Atique Ahmed murder case : Death of the person who gave the pistol to the shooters)

गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांचा प्रयागराजमध्ये गोळ्या (Firing) घालून खून करण्यात आला आहे. त्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल हे सोधी याने पुरविल्याचे पुढे आले होते. त्याच सोधीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.

अतिक अहमदला त्याच्या खुनाची भीती वाटत होती. अतिक अहमदला ११ एप्रिल रोजी कोर्टात सादर करण्यासाठी नेले जात असताना त्याने पोलिसांवरच संशय घेतला होता. त्यांचा हेतू योग्य नाही. आपल्याला ठार मारायचे आहे, असे अतिकचे म्हणणे होते. त्याचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला जाऊ शकतो. अतिक अहमदचा भाऊ अश्रफ याला त्याच्या खुनाची तारीख माहीत होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण २९ मार्च रोजी अशरफने पोलिस कोठडीत दिलेल्या जबाबात एका पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला दोन आठवड्यांत तुरुंगातून बाहेर काढून मारण्याची धमकी दिली होती, असे म्हटले आहे.

अतिक आणि अशरफ खूनप्रकरण सर्वोच्च न्यायालयात

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या खुनाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲड विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, यूपीमध्ये २०१७ पासून झालेल्या १८३ चकमकींची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तज्ज्ञ समितीमार्फत करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

अहमद खूनप्रकरणी न्यायालयीन चौकशी

उत्तर प्रदेश सरकारच्या गृह विभागाने गॅंगस्टार अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या खूनप्रकरणी ३ सदस्यांची न्यायालयीन चौकशी केली आहे. हा आयोग २ महिन्यांत चौकशी अहवाल देईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरविंद कुमार त्रिपाठी या आयोगाचे अध्यक्ष असतील, तर माजी डीजीपी सुभेश कुमार सिंह आणि माजी जिल्हा न्यायाधीश ब्रिजेश कुमार सोनी या आयोगाचे सदस्य असतील. (Latest Political News)

शूटर्संना आज पुन्हा कोर्टात हजर करणार

अतिक आणि अशरफ यांच्या खुनाचा आरोप असलेल्या तीन शूटर्संना पोलिस कोठडीत ठेवण्याची तयारी पोलिस करत आहेत. आज दुपारी ४ वाजता पोलिस तीनही शूटर्सना न्यायालयासमोर हजर केले जणार आहे. रविवारी न्यायालयाने तीनही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT