Mahavikas Aghadi Sabha : शिवरायांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम १० महिन्यांपूर्वी झाले : सुनील केदारांचा शिवसेना बंडखोरांवर हल्लाबोल

जे संविधान जाळतात, फाडून टाकतात, त्या लोकांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का?
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘जान जाऐ पर वचन न जाऐ’ ही शिकवण दिली. वाटेल ते झाले तरी शब्द मोडायचा नाही. पण, दहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राला काळिमा लावण्याची कृती झाली. महाराष्ट्रातील मराठी माणूस खोक्याच्या माध्यमातून विकला गेला. हा शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक आपल्याला धुवून काढायचा आहे आणि पन्नास खोक्यांचा विषय आपल्याला कायमस्वरूपी संपवायचा आहे, अशा शब्दांत काँग्रेस (Congress) नेते सुनील केदार (Sunil kedar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस सहकाऱ्यांवर हल्लाबोल केला. (Ten months ago there was an act to tarnish Maharashtra : Sunil Kedar)

महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठची दुसरी सभा आज (ता. १६ एप्रिल) नागपूर येथे होत आहे. त्या सभेत केदार बोलत होते. सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबदास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Sunil Kedar
Solapur News : माझा शिवसेना प्रवेश सुषमा अंधारेंना उत्तर देण्यासाठी नाही : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ज्योती वाघमारेंची स्पष्टोक्ती

सुनील केदार म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून देश चालावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी संविधान लिहिले होते. मात्र, या देशाचे दुर्दैव असं की भाजपच्या लोकांनी दिल्लीत २०१७ मध्ये संविधान फाडलंच नाही, तर जाळूनसुद्धा टाकलं आहे, तरीसुद्धा आम्ही गप्प बसतोय. जे संविधान जाळतात, फाडून टाकतात, त्या लोकांना देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का, असा माझा सवाल आहे.

Sunil Kedar
Mangalveda Politic's : ‘प्रशांतराव, तुम्ही म्हणताय म्हणून ढोबळे भाजपत आहेत; पण आम्हाला तसं..’ : साळुंखेंनी ठेवले ढोबळेंच्या दुःखावर बोट

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्राला जगात आण बाण शान मिळवून दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘जान जाऐ पर वचन न जाऐ’ ही शिकवण दिली आहे. वाटेल ते झाले तरी शब्द मोडायचा नाही. पण, या महाराष्ट्राला काळिमा लावण्याची कृती दहा महिन्यांपूर्वी करण्यात आली. ही शरमेची गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडली आहे, असे केदार यांनी सांगितले.

Sunil Kedar
Atique Ahmed news : हल्ल्यापूर्वी अतिकने सांगितली १४ जणांची नावे : पाकिस्तानमधून शस्त्रे पुरविणारी 'ती' व्यक्ती कोण?

ते म्हणाले की, दुर्दैव तरी पहा, आज महाराष्ट्रात कोणत्या घोषणेला सर्वांत जास्त प्रतिसाद मिळतो. ‘पन्नास खोके ऽऽ एकदम ओकेऽऽऽ हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. या महाराष्ट्रातील मराठी माणूस खोक्याच्या माध्यमातून विकला जात आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक आपल्याला धुवून काढायचा आहे आणि पन्नास खोक्याचा विषय आपल्याला महाराष्ट्रातून कायमस्वरूपी संपवायचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com