Atishi  Sarkarnama
देश

Delhi New CM Atishi : 'माझं अभिनंदन करू नका, आज मी खूप दुःखी' ; मुख्यमंत्रिपदी निवड होवूनही आतिशी आहेत नाराज!

Mayur Ratnaparkhe

Aam Aadmi Party Atishi Marlena : दिल्लीच्या भावी मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पार्टीकडून आतिशी मार्लेना यांची निवड करण्यात आली आहे. आपचे राष्ट्रीय संजोयक आणि दिल्लीचे मुख्यंमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला होता, ज्यास सर्व आमदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

ज्यामुळे आता आतिशी यांच्या रूपाने दिल्लीला तिसऱ्यांदा महिला मुख्यमंत्री लाभणार आहेत. आतिशी यांच्यावर जरी शुभेच्छांचा वर्षाव होत असला, तरी आतिशी यांनी मात्र आपण दु:खी असल्याचं म्हटलं असून, माझं अभिनंदन करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्यानंतर मीडियाला प्रतिक्रिया देताना आतिशी यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, आज मला जेवढा आनंद आहे, तेवढ्याच जास्त प्रमाणात दु:खही वाटत आहे. मला मुख्यमंत्री बनल्याबद्दल कुणीही शुभेच्छा देवू नये. हारही घालू नका. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे दिल्लीच्या लोकांना अतिशय वाईट वाटत आहे. दिल्लीकर भाजपच्या(BJP) षडयंत्रामुळे नाराज आहेत.

आतिशी म्हणाल्या, मी सर्वात आधी अरविंद केजरीवाल यांचे आभार व्यक्त करते. ज्यांनी मला एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे. केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझे नेते आणि गुरू केजरीवाल यांना याबद्दल धन्यवाद.

याशिवाय आतिशी यांनी पुढे म्हटले की, हे आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party)मध्येही होवू शकतं. जिथं पहिल्यांदाच आमदार झालेल्या व्यक्तीस थेट मुख्यमंत्री बनवलं जातं. मी अतिशय आनंदी आहे की केजरीवाल यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला, याचबरोबर दु:खीही आहे की आज अरविंद केजरीवाल राजीनामा देत आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्यानंतर जनतेला संबोधित करताना आतिशी म्हणाल्या, तुम्ही मला शुभेच्छा देवू नका. हारही घालू नका. आज अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) राजीनामा देत आहेत. आज अतिशय दु:खाचा क्षण आहे. मी केवळ निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्री पदावर असेन. केजरीवाल यांनी त्यागाचे नवीन उदाहरण सादर केले आहे.

पुन्हा केजरीवालांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. मी निवडणूक होईपर्यंत मुख्यमंत्री म्हणून एकच काम करणार आहे,भाजप आणि उपराज्यपाल ज्या योजनांना बंद करण्याचा प्रयत्न करतील, त्या चालू ठेवायच्या आहेत. मी दिल्लीच्या लोकांचे रक्षण करेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT