Giriraj singh sarkarnama
देश

Giriraj singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, तरुणाला अटक

Attack on Giriraj singh : सिंह यांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Roshan More

Giriraj singh News : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर एक तरुणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे. मंत्री गिरीराज सिंह यांनी याविषयी माहिती दिली. बिहारमधील बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात आज (शनिवारी) गिरीराज सिंह यांचा जनता दरबार सुरू असताना एका तरुणाने गिरीराज सिंह धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.

सिंह यांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

गिरिराज सिंह यांनी आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद सैफी यांच्यावर गोंधळ घालण्याचा आणि हल्ला केल्याचा आरोप केला आहे. सैफी यांनी गिरीराज सिंह यांच्या विरोधात घोषणा दिल्याचाही आरोप आहे.

आपल्या ट्विटरवर गिरीराज सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'मी गिरीराज आहे आणि समाजाच्या हितासाठी मी नेहमीच बोलत राहीन आणि संघर्ष करत राहीन. मी या हल्ल्यांना घाबरत नाही.'

वक्फ बोर्डावर प्रश्न

गिरीराज सिंह यांनी वक्फ बोर्डावर प्रश्न उपस्थित केले असून वक्फ बोर्ड बेगुसराय येथील हिंदूंच्या जमिनीवरही नोटीस पाठवत आहे आणि त्यावर आपला दावा करत आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह बलिया उपविभागीय कार्यालयात आयोजित जनता दरबारात लोकांना भेटत होते आणि लोकांच्या समस्या ऐकत होते. त्याचवेळी मोहम्मद सैफी तेथे आले आणि त्यांनी माईक हातात घेत काही वक्तव्य केले. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी करत सैफी यांच्या हातातील माईक घेण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी सैफी यांनी गिरिराज सिंह यांच्या दिशेने धावत त्यांना बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी सैफी यांना पकडले. सैफी यांनी मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्याचे गिरिराज यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT