देश

Australia Terror Attack : 'ऑस्ट्रेलिया' हल्ल्याचं थेट 'पाकिस्तान' कनेक्शन? गोळीबार करणारा 'तो' तरुण कोण? पाहा व्हायरल फोटो!

Pakistan connection terror attack : ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यामागे पाक कनेक्शन? गोळीबार करणारा तरुण कोण आहे? व्हायरल फोटोमुळे खळबळ.

Rashmi Mane

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील प्रसिद्ध बाँडी बीच परिसरात झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जग हादरले आहे. या दहशतवादी हल्ल्याचा भारतासह जगभरातील अनेक देशांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर आता धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.

सिडनीतील वरिष्ठ कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्ल्यातील संशयितांपैकी एकाची ओळख नवीद अकरम अशी झाली आहे. तो सिडनीच्या बॉनिरिग भागात राहत होता आणि मूळचा पाकिस्तानातील लाहोरचा असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर नवीद अकरमचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून, ऑनलाइन समोर आलेल्या एका ओळखपत्राच्या छायाचित्रात नवीद पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घातलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीद अकरमने इस्लामाबादमधील एका विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अल-मुराद इन्स्टिट्यूटमध्येही काही काळ अभ्यास केला होता.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन गोळीबार करणारे होते. त्यापैकी एकाला घटनास्थळीच ठार करण्यात आले, तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का, किंवा या दोघांना कुणाची मदत होती का, याचा पोलिस सखोल तपास करत आहेत.

या दहशतवादी हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हनुक्का या यहूदी सणाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या हजारो लोकांवर अचानक अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. ऑस्ट्रेलियन सरकारने या घटनेला अधिकृतपणे दहशतवादी हल्ला घोषित केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT